शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

अकोटात आपत्ती निवारणाचे साहित्य धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:09 IST

पूरस्थितीचा सामना करण्याकरिता महसूल यंत्रणेला देण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्री तहसील कार्यालयात धूळ खात पडली आहे.

- विजय शिंदे  अकोट: तालुक्यात पावसामुळे तसेच धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने नदी-नाले दुधडी भरून वाहत आहेत. जास्त पाऊस झाल्यास अकोट उपविभागातील ४१ गावांना पुरापासून धोका निर्माण होतो. गत काही वर्षांपासून पावसाळ्यातील संकट व त्यानंतर महसूल यंत्रणेची धावपळ निरर्थक ठरते. दरम्यान, अनेकजण वाहून जातात. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अकोट तालुक्यात ६७९.४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसामुळे शेततळे, धरणाच्या जलसाठ्यात बुडून मृत्यू झाले आहेत. पुरापासून दुर्दैवी घटना घडल्यानंतरही प्रशासन झोपेत असल्याचे दिसत आहे. पूरस्थितीचा सामना करण्याकरिता महसूल यंत्रणेला देण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्री तहसील कार्यालयात धूळ खात पडली आहे. अकोट उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय व काही ग्रामपंचायतींमध्ये हे साहित्य अडगळीत पडलेले आहे. स्वच्छता व निगा ठेवलेली नाही. बोटमधील मशीन काढलेली असून, तीही धूळ खात पडलेली आहे. अनेक ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात जॅकेट, ट्युब हे उंदराचे खाद्य झाले असून, निरुपयोगी झाले आहे. अकोट तहसील कार्यालयात पूरनियंत्रण कक्ष उघडण्यात आल्याचे दिसले नाही. केवळ एका रजिस्टरवर पावसाची नोंद घेतल्याचे आढळून आले. राम भरोसे सुरू असलेल्या तहसील कार्यालयाने पावसाळ्यातील संकटाचा सामना करण्यासाठी साहित्य व बोटसह ‘अलर्ट’ राहणे गरजे झाले. या दुर्लक्षित व गंभीर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.अद्याप दमदार पाऊस कोसळला नसला तरी संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना तर सोडाच, आपत्ती निवारणाचे साहित्यही धूळ खात पडलेले आहे. अकोट तहसीलमध्ये आपत्ती निवारण केंद्रही अद्ययावत नाही. दुसरीकडे अकोट उपविभागातील ४१ गावांना भविष्यात पुराचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसील कार्यालयाचे मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. अकोटात आपत्ती निवारणासाठी मिळालेली बोट तहसीलदारांच्या निवासस्थानी भंगारमध्ये पडलेली असल्याचे आढळले. या बोटीचे इंजिन काढून ते तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोला