अकोट : उमरा येथे १४ वर्षीय बालकाचा गळफास घेतल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 09:24 IST2018-02-07T09:22:40+5:302018-02-07T09:24:40+5:30
अकोट : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा येथे ऋषिकेश संतोष सरदार या १४ वर्षीय बालकाचा ६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.

अकोट : उमरा येथे १४ वर्षीय बालकाचा गळफास घेतल्याने मृत्यू
ठळक मुद्देऋषिकेश संतोष सरदार असे मृत बालकाचे नावग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा येथे ऋषिकेश संतोष सरदार या १४ वर्षीय बालकाचा ६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यावेळी त्याचे वडील ऑटोचालक असून, ते बाहेरगावी गेले होते, तर आई शेतात गेली होती. आई घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलीस पाटील विजय खवले यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, ऋषिकेशचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे पो.काँ. राजू जौंधरकर यांनी सांगितले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.