शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

अकोल्याची हवा खराब; धुळीचे प्रमाण खूप जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:56 IST

शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणार्‍या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. ही धुळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २0१६ पासून कृती आराखडा तयार करण्याचे बजावल्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही.

ठळक मुद्देकृती आराखडाच नाहीप्रदूषण मंडळाने महापालिकेला दिली कारवाईची नोटीसराज्यातील १७ प्रदूषित शहरांमध्ये समावेश

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणार्‍या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. ही धुळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २0१६ पासून कृती आराखडा तयार करण्याचे बजावल्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही. या प्रकाराने महापालिका पर्यावरण, मानवी आरोग्याशी खेळत आहे, त्यासाठी गंभीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस ३ नोव्हेंबर रोजी मंडळाने बजावली. विशेष म्हणजे, महापालिकेचा कृती आराखडा १६ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्यालय मुंबईत सादर करावा लागणार आहे. हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १७ शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. त्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तातडीने सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश देण्यासोबत राष्ट्रीय हवा शुद्धता कार्यक्रम राबवण्याचेही बजावले. त्यावर राज्य विधिमंडळाच्या मार्च २0१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात आली. त्यावेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्याचा आराखडा तयार केला जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानुसार राज्यातील सर्व शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आला; मात्र अकोला महापालिकेने हा विषय गांभीर्यानेच घेतला नाही. सजीवांना जगण्यासाठी प्रत्येक श्‍वासाला लागणार्‍या हवेची गुणवत्ता सुधारण्यातही महापालिकेची उदासीनता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. आता १६ नोव्हेंबर रोजी मुख्यालयात हवेची गुणवत्ता सुधारणा करण्याचा आराखडा प्राप्त न झाल्यास महापालिकेवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत दिला आहे. 

शहरातील हवा खराब करणारे घटकहवेचे प्रदूषण मुख्यत्वे वाहतूक, एकाच जागेवर सतत इंधनाचे ज्वलन, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यासारख्या जीवाश्म इंधनाचे जळणे, यासोबतच त्यामध्ये खराब रस्ते, निर्माणाधीन बांधकामे यातून मोठय़ा प्रमाणात धूळ निर्माण होते. 

हवेतील गुणवत्ता व धूळ मोजणीची ठिकाणेअकोला शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी विविध ठिकाणी केली जाते. त्यामध्ये रेल्वेस्थानकालगत शिवाजी पार्क, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ वसाहत फेज-२, लरातो वाणिज्य महाविद्यालय, सिव्हिल लाइन. 

मॉर्निंग वॉक ला जाणार्‍यांचेही आरोग्य धोक्यातपहाटेच्या काळातील हवेची गुणवत्ता पाहता त्यामध्येही धुळीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून घशाचे आजार, डोळ्य़ांची जळजळ यासारखे आजार बळावतात. धुळीचा सर्वात घातक परिणाम लहान मुलांवर होतो. श्‍वसनातून हवेतील घटक थेट त्यांच्या शरीरात पोहचतात. तेथेच चिकटून राहतात. त्यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. 

दर दिवशी धुळीचे  प्रमाण सारखेचतपासणीच्या दिवशीच्या तीन टप्प्यात दर दिवशी सारखेच धुळीचे प्रमाण आहे. त्यामध्ये सकाळी ६ ते दुपारी २ या काळात सरासरी १३५ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर, दुपारी २ ते रात्री १0 या काळात १४७ मायक्रोग्रॅम  प्रती घनमीटर, रात्री १0 ते पहाटे ६ पर्यंतच्या काळात १४0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर, आरएसपीएम धूळ हवेत असल्याचा अहवाल आहे. 

धुळीचे घटकनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवा तपासणीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे. हवेत धुळीचे प्रमाण १00 मायक्रोग्रॅम प्रती १ घनमीटरला धूळ (आरएसपीएम-रिस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिकल मॅटर) एवढे सहन केले जाऊ शकते; मात्र शहरातील तीनही केंद्रांवर केलेल्या हवा तपासणीत हे प्रमाण सरासरी १४0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर असल्याचा अहवाल आहे. 

हवेतील धुळीचे हे प्रमाण आरोग्यासाठी धोक्याचे आहे. दमा, अस्थमा, फुप्फुसांचे आजार वेगाने बळावतात. क्षयरोगही होते. अशक्त रुग्णांना प्रसंगी श्‍वसनासाठी ऑक्सिजनचाही पुरवठा करावा लागतो. - डॉ. अभिजित अडगावकर, सहयोगी प्राध्यापक, औषध विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

महापालिकेला सातत्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पत्र दिले आहे. राज्य मुख्यालयानेही आता नोटीस देत आराखडा मागवला आहे. - राहुल मोटे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला. 

टॅग्स :pollutionप्रदूषण