‘स्वरानंदवन’मुळे अकोलेकरांची संध्याकाळ सूरमय

By Admin | Updated: December 22, 2014 01:06 IST2014-12-22T01:06:10+5:302014-12-22T01:06:10+5:30

आनंदवनातील आदिवासी बांधवांनी सादर केली भन्नाट गीत.

Akolekar's evening sunlight due to 'Swarandhanvan' | ‘स्वरानंदवन’मुळे अकोलेकरांची संध्याकाळ सूरमय

‘स्वरानंदवन’मुळे अकोलेकरांची संध्याकाळ सूरमय

अकोला : सर्मपण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित स्वरानंदवन हा बाबा आमटे यांच्या आनंदवनातील आदिवासी बांधवांचा सूरमयी संगीत कार्यक्रम रविवार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी खुले नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. कार्यक्रमात आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त कलाकारांनी विविध चित्रपट गीते सादर करून अकोलेकर रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पार पडलेल्या स्वागत समारोहाप्रसंगी ह्यस्वरानंदवनह्णचे निर्माते डॉ. विकास आमटे, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालयाचे दिलीप काळे, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, जयप्रकाश पाटील, सुभाष भिरड, नंदकिशोर पाटील, सचिन बुरघाटे व सर्मपण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. विकास आमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना आणि उद्देश विशद करून, अकोलेकरांना आनंदवनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी महापौर देशमुख व संतोष कोरपे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर पार पडलेल्या मुख्य सूरमयी संगीत कार्यक्रमात उत्कृष्ट वाद्य वृंदाच्या साथीने आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील विविध गीते सादर केली. एकापेक्षा एक गीत सादर करून कलाकारांनी अकोलेकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ. विकास आमटे यांनी स्वत: हम होंगे कामयाब. हे गीत सादर करून श्रोत्यांच्या मनात आत्मविश्‍वस जागृत केला. श्रोत्यांनीदेखील त्यास भरभरून प्रतिसाद दिला.

Web Title: Akolekar's evening sunlight due to 'Swarandhanvan'