न्यूयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागताचा मान अकोलेकरांना

By Admin | Updated: September 24, 2015 23:51 IST2015-09-24T23:51:00+5:302015-09-24T23:51:00+5:30

मोदींच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या अनिवासी भारतीयांच्या चमूत अकोलेकर दाम्पत्य व त्यांच्या चिमुकल्या मुलींचाही समावेश.

Akolekar honored Modi in New York | न्यूयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागताचा मान अकोलेकरांना

न्यूयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागताचा मान अकोलेकरांना

अकोला: अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी न्यूयॉर्क येथे पोहोचले. तिथे मोदींच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या अनिवासी भारतीयांच्या चमूत अकोलेकर दाम्पत्य व त्यांच्या चिमुकल्या मुलींचाही समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. गुरुवारी त्यांचे विमान न्यूयॉर्क विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांचा ताफा हॉटेल वर्ल्डफोर्ड इस्टोनियाजवळ पोहोचला. या हॉटेलमध्ये पोहोचताच अनिवासी भारतीयांनी मोदींचे भव्य स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या चमूमध्ये योगेश रामदास तळोकार व अजय भोंडे या मूळच्या अकोल्यातील दोघा तरुणांचा त्यांच्या कुटुंबीयांसह समावेश होता. यावेळी सानवी तळोकार व मधुश्री भोंडे या चिमुकल्या अस्सल मराठमोळय़ा वेशभूषेत होत्या. योगेश तळोकार हे अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेवानवृत्त कर्मचारी रामदास महादेव तळोकार यांचे पुत्र आहेत.

Web Title: Akolekar honored Modi in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.