शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सप्तसुरांच्या मैफलीसोबतच अकोलेकरांनी घेतला ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:55 IST

कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्घेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मोरया मोरया, दिल है छोटासा...., दमा दम मस्त कलंदर ते झिगांटच्या तालावर मनसोक्त नृत्य तसेच सुरांमध्ये चिंब होत अकोलेकरांनी  लोकमत सखी आनंदोत्सवात लोकमत बाल विकास मंच व फुर्टाडोझ स्कूल आॅफ म्युझिकतर्फे आयोजित म्युझिकल कॉन्सर्टमध्ये एकच धूम केली. गेल्या शुक्रवारपासून आयोजित आनंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाकरिता आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मित्तल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीराम मित्तल, वंदना मित्तल, ललित ट्युटोरियल्सचे ललित काळपांडे व दीप्ती काळपांडे, फुर्टाडोझ म्युझिक स्कूलचे व्होकल हेड डॉ. रेजी सुरेंद्रन व डस्टर हेड अंकित जैन हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्घेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर म्युझिकल कॉन्सर्टमध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. रेजी सुरेंद्रन, सारेगम फेम ऐश्वर्या सहस्रबुद्धे, ताकधिनाधिन फेम आनंद जहागीरदार, व सूर नवा ध्यास नवा फेम राजकुमार निंबोकार या गायकांनी एकाहून एक सरस आणि धमाकेदार हिंदी मराठी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत गाण्यांवर ताल धरायला लावला. सप्तसुरांच्या मैफलीसोबत शॉपिंग फेस्टिव्हलचे शेवटचे दोन दिवस शिल्लक.

शॉपिंग उत्सवाचे अंतिम दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ९ वाजतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित शॉपिंग उत्सवामध्ये ४० स्टॉल असून, यामध्ये विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, गृह सजावट, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, आॅटोमोबाइल यासह चटकदार पदार्थांचा फुड झोनदेखील अकोलेकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या पाच दिवसीय शॉपिंग फेस्टिव्हलचे अंतिम दोन दिवस बाकी आहेत. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, अकोलेकरांनी सहकुटुंब भेट द्यावी.

सोनरूपमतर्फे सखी मंच सदस्यांना पोहेहारलोकमत शॉपिंग उत्सवामध्ये सखी मंच सदस्यांना सोनरूपमतर्फे पोहेहार मिळण्याचे अंतिम दोन शिल्लक असून, त्यासाठी सदस्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० दरम्यान ओळखपत्र व सोनरूपमचे कूपन दाखविणे अनिवार्य आहे.

लोकमत सखी आनंदोत्सवात सखींचे एकत्रीकरण बघून महिला सक्षमीकरणाचे स्तुत्य काम लोकमत समूहातर्फे होत आहे. महिला सर्वच क्षेत्रात पुढाकार घेऊन देश निर्माणाकरिता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करीत आहेत. ‘लोकमत’चे राज्य स्तरावर तसेच अकोल्यातील उपक्रमांमुळे तळागाळातील कर्तृत्ववान व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होते.-गोपीकिशन बाजोरिया, आमदार

लोकमत सखी मंचतर्फे महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यानुषंगाने विविध उपक्रम राबविले जात असतात. लोकमत आनंदोत्सवात महिलांना मनोरंजनासोबतच शॉपिंगचाही मनमुराद आनंद घेता येतो. अकोलेकरांसाठी लोकमत सखी आनंदोत्सव ही एक पर्वणीच आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटAkolaअकोला