अकोलेकरांनी केली जलमुक्त धुळवड साजरी!

By Admin | Updated: March 26, 2016 02:26 IST2016-03-26T02:26:25+5:302016-03-26T02:26:25+5:30

लोकमतच्या आवाहनाला अकोलेकरांचा प्रतिसाद.

Akolekar celebrated the burning of Dhulwad! | अकोलेकरांनी केली जलमुक्त धुळवड साजरी!

अकोलेकरांनी केली जलमुक्त धुळवड साजरी!

अकोला: जलमुक्त धुळवड साजरी करून पाण्याची नासाडी थांबवावी, या लोकमतने केलेल्या आवाहनाला शहरात सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका, परिचारिकांनी जलमुक्त धुळवड साजरी करून कोरडी होळी खेळण्याची शपथ घेतली होती. अकोलेकरांनी या आवाहनाला प्रतिसाद देत बच्चे कंपनी ते आबालवृद्धापर्यंत जलमुक्त धुळवड साजरी केली. लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिपरिचारिका, महाविद्यालयातील विभागप्रमुखांनी जलमुक्त धुळवड खेळण्याचे आवाहन केले होते. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, विभाग प्रमुख आणि सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका, परिचारक, सफाई कामगारांना जलमुक्त धुळवड साजरी करण्याची शपथ घेतली होती. त्या शपथेची अंमलबजावणी पाणी न वापरता धुळवड साजरी करू न केली. महावितरण कंपनी, गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र, शहरातील अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तसेच शहरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ह्यजलमुक्त होळीह्ण ह्यलोकमतह्णच्या या स्तुत्य उपक्रमाला साथ दिली. मागील वर्षी राज्यात कमी झालेला पाऊस, मराठवाडा, विदर्भात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई या सर्व पार्श्‍वभूमीवर जलमुक्त धुळवड साजरी केली. विशेष म्हणजे अकोलेकरांनी या स्तुत्य उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद देऊन आम्हीही दुष्काळाच्या झळा सोसणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाला साथ देत जलमुक्त होळी साजरी केली. अनेक ठिकाणी बच्चे कंपनी, महिला, पुरुष, आबालवृद्धांनी पाण्याविना रंग उधळून धुळवड साजरी केली आहे.

Web Title: Akolekar celebrated the burning of Dhulwad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.