रेखाकला परीक्षेमध्ये अकोल्याची बाजी

By Admin | Updated: February 14, 2015 01:36 IST2015-02-14T01:36:16+5:302015-02-14T01:36:16+5:30

बारापैकी ५ मेरिट अकोल्याचे.

Akolay betting in the graphic examination | रेखाकला परीक्षेमध्ये अकोल्याची बाजी

रेखाकला परीक्षेमध्ये अकोल्याची बाजी

अकोला: महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून, यामध्ये अमरावती विभागात अकोल्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीतील बारापैकी ५ विद्यार्थी अकोल्याचे असून, या जिल्ह्याचा ९६.0४ टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएटचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३,९७,0६३ विद्यार्थ्यांनी नावे दाखल केली होती. त्यापैकी ३,६७,९५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेचे एकूण १२ विभागातून मूल्यांकन करण्यात आले. अमरावती विभागातून या परीक्षेत १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अकोल्याची मोनिका पानझाडे, प्रतीक्षा डोंगरदिवे या, तर यवतमाळ जिल्ह्यातील इंद्रजित पटीया, साक्षी गोडेकर, प्रज्वल गोट यांचा समावेश आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत अकोल्याची प्राची अहीर, साक्षी दळवी, पूजा डेहानकर, शुभांगी गोरे यांचा समोवश असून, बुलडाण्याचा काजी आयण, यशश्री देशमुख या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत. अमरावती विभागात एलिमेंटरी परीक्षेच्या निकालात अकोला जिल्हा प्रथम असून, अमरावती जिल्हा सर्वात मागे आहे. अकोला जिल्ह्याचा निकाल ९६.0४ टक्के, यवतमाळ ९५.१२ टक्के, बुलडाणा ९३.५७ टक्के, वाशिम ९२.३१ टक्के तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९0.७९ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून ४८१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळ जिल्ह्यातून १४३५ विद्यार्थ्यांपैकी १३६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ३४१५ विद्यार्थ्यांपैकी ३२८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाशिममधून ९६३ विद्यार्थ्यांपैकी ८८९, बुलडाणा जिल्ह्यातून ३७६८ विद्यार्थ्यांपैकी ३३३0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती विभागातून १४१४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३२३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Web Title: Akolay betting in the graphic examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.