शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

दिलासादायक  : अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:09 PM

आठवडाभरात ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबहुतांश रसायने उपलब्ध झाल्याने लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही वैद्यकीय उपकरणे मिळाली नसल्याने लॅब सुरू होण्यास दिरंगाई होऊ शकते. आगामी दोन दिवसांत ही समस्याही सुटणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

अकोल: कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय नमुने तपासण्यासाठी विदर्भात केवळ एकच लॅब कार्यान्वित आहे. त्यामुळे अकोल्यातील प्रस्तावित ‘व्हीआरडीएल’ लॅबकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे; मात्र लॅबसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि रसायने उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशातच आठवडाभरात अकोल्यातील लॅब सुरू होण्याची शक्यता असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. विदर्भात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची चाचणी जलद गतीने होणे गरजेचे झाले आहे.नागपूर, यवतमाळपाठोपाठ बुलडाणा, वाशिम आणि अमरावती येथेही कोरोनाचे रुग्ण आढळले असून, दररोज संदिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे; परंतु तपासणीचा भार नागपूरस्थित एकमेव लॅबवर येत आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब महत्त्वाची भूमिका बजावू शकते; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे लॅबसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच रसायने पुरविण्यासाठी पुरवठादारच उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या; परंतु आवश्यक ३० ते ३५ प्रकारच्या रसायनांपैकी बहुतांश रसायने उपलब्ध झाल्याने लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र अद्यापही काही वैद्यकीय उपकरणे मिळाली नसल्याने लॅब सुरू होण्यास दिरंगाई होऊ शकते. असे असले तरी आगामी दोन दिवसांत ही समस्याही सुटणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून, आठवडाभरात ही लॅब सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने उपलब्धप्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने व उपकरणे मिळाली असून, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रविवारी वाहन पाठविण्यात आल्याची माहिती आहे. ही रसायने मिळाल्यानंतर लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

लॅबच्या मान्यतेसाठी ‘आयसीएमआर’कडे करणार मागणी!वैद्यकीय उपकरणे व रसायने उपलब्ध झाल्यानंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ‘आयसीएमआर’कडे लॅब सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर लगेच ‘आयसीएमआर’तर्फे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) किट पुरविण्याची सूचना दिली जाणार असून, अकोला जीएमसीत लवकरच नमुन्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.लॅबसाठी आवश्यक रसायने उपलब्ध झाली आहेत; परंतु काही वैद्यकीय उपकरणे अद्याप मिळाली नाहीत. त्यासाठी पुण्याला वाहने पाठविली आहेत. त्यामुळे लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवडाभरात ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.- डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस