अकोल्याच्या भाजी बाजारात दररोज 50 लाखांची होते उलाढाल
By Admin | Updated: May 16, 2017 15:44 IST2017-05-16T15:38:51+5:302017-05-16T15:44:33+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 16 - अकोला शहरात दररोज तब्बल ५० लाख रुपयांची भाजी विक्री होत असल्याची आकडेवारी समोर ...

अकोल्याच्या भाजी बाजारात दररोज 50 लाखांची होते उलाढाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16 - अकोला शहरात दररोज तब्बल ५० लाख रुपयांची भाजी विक्री होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शहरातील भाजीबाजारातील दैनंदिन विक्रीतून ही आकडेवारी काढली गेली आहे. अकोल्यात सर्वात मोठा भाजीबाजार जनता बाजारात भरतो.
लहान-मोठे पकडून येथे जवळपास ७०० भाजीविक्रेते आहेत. त्यानंतर जैन भाजीबाजार असून, येथे जवळपास ४०० भाजीविक्रेते आहेत. त्या पाठोपाठ जुने शहरातील किल्ल्याजवळचा बाजारात ५०० भाजीविक्रेते आहेत. सिंधी कॅम्पच्या बाजारात ३०० आणि लहान उमरीच्या शाळेच्या परिसरात ३०० भाजी विक्रेते आहेत. जठारपेठ, कौलखेड, मलकापूर आणि गाडीवरून किरकोळ भाजी विक्री करणा-यांची संख्या किमान ३०० च्या घरात आहे. मोठ्या दुकानदारांची दररोजची उलाढाल ५ हजार रुपयांपर्यंत आणि लहान दुकानदारांची दररोजची उलाढाल २ हजार रुपयांच्या घरात जाते.
सरासरी पाहता एक भाजी विक्रेता दररोज दोन हजार रुपयांची उलाढाल करतो. त्यानुसार ही आकडेवारी पन्नास लाख रुपयांच्या घरात जाते. नाशिकसह अकोलाच्या विविध तालुक्यातून, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. दहा रुपये गड्डी आणि २० ते ४० रुपये किलोच्या दराने भाजीपाला विक्रीला आहे.
प्रत्येक उन्हाळ्यात भाजीपाला तुलनात्मक महाग होतो; मात्र यंदा भाजीपाला महाग नसून, मोठ्या प्रमाणात बाजारात येतो आहे. नाशिकचे गाजर आणि कांदे येत असले तरी इतर भाजीपाला मात्र यंदा जिल्ह्याच्या आजूबाजूनेच अकोल्यात येत असल्याचे चित्र आहे
https://www.dailymotion.com/video/x84b9ck