अकोल्याचा मृगसेन देशातून तिसरा, दोन विद्यार्थी गणित ऑलिम्पियाडसाठी पात्र
By Admin | Updated: March 29, 2016 02:29 IST2016-03-29T02:29:28+5:302016-03-29T02:29:28+5:30
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना.

अकोल्याचा मृगसेन देशातून तिसरा, दोन विद्यार्थी गणित ऑलिम्पियाडसाठी पात्र
अकोला : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे राबवल्या जाणार्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अकोल्यातील डवले महाविद्यालयाच्या मृगसेन गोपनारायणने देशातून तिसरा येण्याचा बहुमान पटकाविला. या परीक्षेत चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. किशोरवयातील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी होणारी ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. या परीक्षेसाठी कोणताही निश्चित अभ्यासक्रम नसतो. त्यामुळे ही परीक्षा कठीण मानली जाते. या वर्षी पहिल्या परीक्षेतील अकोल्यातील सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी पाच विद्यार्थी दुसर्या टप्प्यासाठी पात्र ठरलेत. त्यातील चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळविली आहे. यात रा.ल.तो. महाविद्यालयाचे दीप मालू, रामप्रसाद राखोंडे आणि डवले महाविद्यालयाचे ओजस जैन व मृगसेन गोपनारायण यांचा समावेश आहे. या परीक्षेत देशातून तिसरा आलेल्या मृगसेनने बारावीची परीक्षा दिली असून, तो विज्ञान विषयाकडे जाऊ इच्छितो.