अकोल्याचे तापमान ४१.१ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST2021-05-10T04:18:43+5:302021-05-10T04:18:43+5:30

अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी जिल्ह्याचा पारा ४१.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. जिल्ह्यातील काही ...

Akola's temperature is 41.1 degrees Celsius | अकोल्याचे तापमान ४१.१ अंश सेल्सिअस

अकोल्याचे तापमान ४१.१ अंश सेल्सिअस

अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी जिल्ह्याचा पारा ४१.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

----------------------------------------------

फोटो aklcity.महाराणा प्रताप जयंती

महाराणा प्रताप जयंती साजरी

अकोला : हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रविवार, ९ मे रोजी साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप बागेतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अजयसिंह सेंगर, प्रदेश उपाध्यक्ष विनोदसिंग ठाकूर, प्रदेश कोषाध्यक्ष गुरुचरणसिंह यदु, कैलाशसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नवीनसिंह ठाकूर, जिल्हा युवा कार्यकारिणी अध्यक्ष गणेशसिंह ठाकूर, शहराध्यक्ष पवनसिंह ठाकूर, संयोजक पावससिंह सेंगर, शैलेंद्रसिंह ठाकूर, सुजितसिंह ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Akola's temperature is 41.1 degrees Celsius