शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकोल्यातील पक्षी वैभवाची सूची तयार होणार; ईएफईसीचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:59 IST

अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे.

अकोला: जैवविविधतेचे महत्त्व नागरिकांना समजावे. यासाठी त्यांना जैवविविधतेची ओळख होणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे. ईएफईसीच्या पुढाकारातून अकोल्यातील या पक्षी वैभवाची सूची लवकरच तयार होणार असल्याची माहिती ईएफईसीचे उदय वझे, वन्यजीव अभ्यासक व पक्षी निरीक्षक देवेंद्र तेलकर यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली.अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणांवर दुर्मिळ अशा पक्ष्यांचे वास्तव आहे. याशिवाय विदेशी पक्षीसुद्धा स्थलांतर करून आपल्या भागात येतात, असे सांगत, उदय वझे यांनी, ईएफईसी म्हणजेच पर्यावरण आणि वने शिक्षण केंद्र आहे. पर्यावरण, वने आणि वन्यजीव संवर्धनाचे शिक्षण देण्याचे ही संस्था काम करते. पक्षी निरीक्षकांनी परिसरातील पक्षी स्थानांना भेटी देऊन त्यांच्या नोंदी घेतात. यापूर्वी सृष्टीवैभवने पहिले प्रकाशचित्र प्रदर्शनाचे २00३ मध्ये प्रकाशन तत्कालिन जिल्हाधिकारी अनुपकुमार यांच्या हस्ते केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या नोंदींमध्ये वाढ झाली असल्याने, त्याची सूची होणे गरजेचे आहे, असे वझे यांनी स्पष्ट केले. पक्षी निरीक्षक देवेंद्र तेलकर यांनी, मागील अनेक वर्षांच्या नोंदी, पक्ष्यांच्या नावांची सूची तयार करणे वैज्ञानिकदृष्ट्या गरजेचे आहे. ही पक्ष्यांची सूची मराठी भाषेत अकोल्याचे पक्षी वैभव म्हणून आणि इंग्रजी भाषेत बर्डस् इन अकोला नावाने लवकरच तयार होणार आहे. पक्षीमित्रांनी या सूचीमध्ये समावेश न केलेल्या पक्ष्यांची नोंद करण्यासाठी सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्यामुळे ही सूची परिपूर्ण होईल, असे सांगत, तेलकर यांनी, ही पक्षी सूची तयार झाल्यानंतर ती अकोल्यातील एक हजाराहून अधिक शाळांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल; तसेच अकोल्यातील पक्षीमित्रांची सूचीसुद्धा यात असेल. या उपक्रमात वन विभाग, वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाचा सहभाग आहे. ही सूची बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा, असे देवेंद्र तेलकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. विनय पिंपरकर, अ‍ॅड. आर.एम. मोदी, अकोला-बुलडाणा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मानकर, सदस्य सूचित देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाbirds sanctuaryपक्षी अभयारण्यforestजंगल