राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अकोल्याला सुवर्णपदक
By Admin | Updated: November 30, 2014 23:26 IST2014-11-30T22:13:24+5:302014-11-30T23:26:46+5:30
सुनील वानखडे आणि संघपाल वानखडे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड.

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अकोल्याला सुवर्णपदक
अकोला- दी महाराष्ट्र स्टेट पॅरालिम्पिक असोसिएशन व गोंदिया जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनतर्फे आयोजित तिसर्या राज्यस्तरीय व्हिलचेअर फेन्सिंग स्पर्धेत अकोला संघाने सुवर्णपदक मिळविले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविणार्या सुनील वानखडेने विनय साबळेचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने सेबर आणि फॉईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. संघपाल वानखडेने ईपी प्रकारात सुवर्णपदक मिळविले. सुगत लबडे याला कांस्यपदक मिळाले. सुनील आणि संघपाल यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. ही स्पर्धा छत्तीसगडमध्ये बिलासपूर येथे होईल.