दल्ली येथील बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याची संस्कृती महिलांमधून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:30 IST2018-01-17T22:39:06+5:302018-01-17T23:30:54+5:30
अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला.

दल्ली येथील बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याची संस्कृती महिलांमधून प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेतील कॅटेगिरी ‘बी’ आणि कॅटेगिरी ‘सी’ या दोन कॅटेगिरीमध्ये संस्कृती वानखडे हिने अनुक्रमे ९0.४ व ९१.६ गुणांची कमाई केली. ‘बी’ कॅटेगिरीत एकूण ७८३, तर ‘सी’ कॅटेगिरीत १२७३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही कॅटेगिरीमध्ये विविध ठिकाणच्या स्पर्धकांशी तिचा सामना झाला. या स्पर्धेत संस्कृती वानखडे ही महिलांमधून प्रथम आली. या कामगिरीबद्दल संस्कृतीला प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.