Akola ZP Election : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात भाजप उमेदवार पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 16:15 IST2020-01-08T16:15:26+5:302020-01-08T16:15:32+5:30
अकोला पंचायत समितीच्या पळसो गणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला.

Akola ZP Election : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात भाजप उमेदवार पराभूत
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. अकोला पंचायत समितीच्या पळसो गणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला. पळसो हे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे मुळ गाव असून, त्यांच्या गावात भाजपचे उमेदवार मनिष शंकरराव गावंडे यांना भारिप बहूजन महासंघाचे वसंतराव मारोती नागे यांनी पराभूत केले. नागे यांना ३१६८, तर गावंडे यांना १५३५ मते मिळाली आहेत.
जिल्हा परिषद व सातही पंचायत समित्यांचा निकाल जाहीर झाला असून, भारिपने जोरदार मुसंडी मारत विजयाकडे आगेकुच केली आहे.