शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत ठाकरेला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:47 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी ठाकरेचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

ठळक मुद्देपाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होतीमंगळवारी न्यायालयाने आरोपी ठाकरेचा जामीन अर्ज मंजूर केला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी ठाकरेचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  शिक्षण सभापती यांचा स्वीय सहायक असलेला श्रीकांत ठाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळांना होणार्‍या पोषण आहारात खंड पडल्याबाबतची माहिती विचारून तेल्हारा येथील तक्रारकर्त्यास त्रास देत होता. शिक्षण विभागाच्या बैठकीतही ठाकरे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून तक्रारदाराचा पैशांसाठी छळ करण्याचा प्रयत्न करीत असे. पोषण आहारात खंड का पडला, याबाबतची माहिती द्यायची नसेल, तर त्या मोबदल्यात दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी श्रीकांत ठाकरे याने तक्रारदाराकडे केली होती. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचखोर ठाकरेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून ‘एसीबी’च्या कर्मचार्‍यांनी पाळत ठेवून गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास श्रीकांत ठाकरे याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. आरोपी श्रीकांत ठाकरेकडून पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

सभापती अरबट संशयाच्या पिंजर्‍यातशिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट हे पोलिसांसमोर हजर न झाल्याने ते संशयाच्या पिंजर्‍यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या स्वीय सहायक श्रीकांत ठाकरे याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर यामध्ये सभापती अरबट यांचाही सहभाग आहे का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र पोलिसांना अद्याप ठोस पुरावा मिळाला नसला, तरी ठाकरे यांच्या बयानातील काही मुद्यांवरून त्यांच्यावर संशयाची सुई जात आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषदCrimeगुन्हा