शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद : फायली गहाळ प्रकरणात अधिकारी-कर्मचारीही रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:18 IST

अकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यापैकी चौघांनीच स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे इतरांना स्मरणपत्र देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

ठळक मुद्देनऊपैकी चौघांनीच दिले स्पष्टीकरणशिक्षकांकडूनही विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यापैकी चौघांनीच स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे इतरांना स्मरणपत्र देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदूनामावलीचा मोठा घोळ झाला आहे. परिणामी, शिक्षकांची बिंदूनामावलीही मंजूर होऊ शकली नाही. त्या घोळाची चौकशी अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) यांच्या पथकाने केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ७६ शिक्षकांच्या फायली नव्हे, तर केवळ आदेशाच्या प्रती उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली, त्या फाइलला कोणी मंजुरी दिली, त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले, फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्या शिक्षकांना फाइल सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी २ डिसेंबर रोजी दिली. त्यासोबतच या प्रकाराला जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांनाही नोटीस बजावली. त्यापैकी चौघांनी स्पष्टीकरण देत त्यावेळी प्रभार घेतानाच फायली मिळाल्या नसल्याचे म्हटले आहे. 

फायली गहाळ केल्याची संख्याही निश्‍चितइतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांनी फाइल सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नोटीसप्राप्त अधिकार्‍यांमध्ये सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम यांना तीन, सध्या बाश्रीटाकळी येथे कार्यरत तत्कालीन सहायक प्रशासन अधिकारी दिलीप सिरसाट-आठ, बाळापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक दिनेश ढाकरे-एक, कार्यमुक्त कनिष्ठ सहायक बिपिन कमाविसदार यांच्यावर आठ फायलींची जबाबदारी निश्‍चित आहे. 

सर्वाधिक फायलींसाठी संतोष टाले जबाबदारगहाळ झालेल्या ७६ पैकी ३२ फायलींची जबाबदारी तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक संतोष टाले यांच्यावर आहे, तसेच स्पष्टीकरण दिलेल्या चौघांपैकी दोघांनी प्रभार घेताना टाले यांच्याकडून फायली मिळाल्याच नसल्याचे म्हटले. 

स्पष्टीकरणात जबाबदारी झटकलीफायली गहाळ केल्याची नोटीसप्राप्त चौघांनी स्पष्टीकरणात हात वर केले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातील वरिष्ठ सहायक विजय भिवरकर यांनी चार फायली, पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सहायक एन.एम. कढाणे-तीन, रोहयो कक्षातील सहायक लेखा अधिकारी एस.बी. नृपनारायण-सात, मूर्तिजापूर पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक पी.पी. लावंड यांच्यावर सात फायलींची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक