अकोला : रेल्वे मार्गावर युवकाची आत्महत्या, बिर्ला गेटजवळ स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:11 IST2017-12-31T21:07:15+5:302017-12-31T21:11:18+5:30
अकोला : बिर्ला गेटजवळील रेल्वे मार्गावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

अकोला : रेल्वे मार्गावर युवकाची आत्महत्या, बिर्ला गेटजवळ स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बिर्ला गेटजवळील रेल्वे मार्गावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
सिंधी कॅम्प परिसरातील कच्ची खोलीमध्ये राहणारा विशाल मोतीचंद्र हेमनानी (३२) याने रविवारी दुपारी बिर्ला गेटजवळील रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्या चिठ्ठीत त्याने आत्महत्येसाठी कोणाला दोषी धरू नये, असे लिहून आईचा मोबाइल क्रमांक लिहिला आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करीत असल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार शैलेश स पकाळ यांनी दिली.