युवा राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याला दोन पदक
By Admin | Updated: February 27, 2016 01:32 IST2016-02-27T01:32:39+5:302016-02-27T01:32:39+5:30
अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांच्या शानदार खेळाचे प्रदर्शन.

युवा राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याला दोन पदक
अकोला: आंध्रप्रदेशातील भिमाराम येथे आयोजित युवा राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांनी शानदार खेळ प्रदर्शन करीत महाराष्ट्राला दोन पदकांची कमाई करू न दिली. या स्पर्धेतून अकोल्याच्या ४ बॉक्सरांनी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात स्थान निश्चित केले.
पदक विजेता अनंता चोपडे ५२ किलो वजनगट, शिवम चौधरी ९१ किलोच्या वर वजनगटात तसेच ५६ किलो वजनगटात हरिवंश टावरी, ९१ किलो वजनगटात अजय आसेरी यांची निवड प्रशिक्षण शिबिराकरिता झाली आहे.
अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, क्रीडापीठ उ पसंचालक माणिक ठोसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, महाराष्ट्र बॉ िक्संग असोसिएशनचे सचिव भरतकुमार व्हावळ, अध्यक्ष जय कोहली यांनी खेळाडूंचे कौतुक केले. बॉक्सरांना राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट, सहायक प्रशिक्षक पुरुषोत्तम बावणे यांचे मार्गदर्शन लाभले.