आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके

By Admin | Updated: May 3, 2017 01:09 IST2017-05-03T01:09:09+5:302017-05-03T01:09:09+5:30

अकोला : भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडंूनी दोन सुवर्णपदके पटकावले.

Akola won two gold medals in the International Hapkido Boxing Championships | आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके

आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके

अकोला : भूतान येथे ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडंूनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्णपदके पटकावले. प्रियंका इंगळे व साहिल गोखले यांनी आपापल्या वजनगटात सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.
प्रियंका व साहिलची फ्लोरिडा (यूएसए) येथे १२ व १३ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपकरिता याच स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे. दोघेही प्रशिक्षक मनोज अंबेरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत.

Web Title: Akola won two gold medals in the International Hapkido Boxing Championships