अकोल्यासाठी निधी कमी पडू देणार नाही!

By Admin | Updated: August 29, 2016 01:29 IST2016-08-29T01:29:19+5:302016-08-29T01:29:19+5:30

भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिपादन; भाजप गुजराती मंचाची स्थापना.

Akola will not let the funds fall short! | अकोल्यासाठी निधी कमी पडू देणार नाही!

अकोल्यासाठी निधी कमी पडू देणार नाही!

अकोला, दि. २८ : जन्मभूमी बुलडाणा जिल्हा असला, तरी कर्मभूमी ही अकोलाच राहिली आहे. अकोला शहराने मला व भाजपला भरभरुन दिले आहे. अकोल्यानेच मला संसदेची वारी घडविली आहे. आता सत्तेत आल्यानंतर परतफेड करण्याची वेळ आली आहे. अकोला शहराच्या विकासासाठी निधीची मुळीच कमी पडू देणार नाही. लोकप्रतिनिधींनी मागावे, आम्ही तत्पर आहोत, असा शब्द रविवारी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकरांनी गुजराती समाजाच्या साक्षीने दिला.
गुजराती समाज हा नेहमीच भारतीय जनता पक्षासोबत राहिलेला आहे. आता अकोला भाजपने गुजराती समाज मंच ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. हा गुजरात मंच भाजप व गुजराती समाजाचे नाते अधिक पक्का करणारा नवा पूल ठरेल. स्थानिक संघवीवाडी येथे रविवार, २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात भाजप गुजराती मंचाची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, भाजप महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, मनपा सभापती विजय अग्रवाल, गुजराती मंचचे विजय परमार, शीतल रुपारेल, निमेश ठक्कर, दिपेन शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना, भाऊसाहेब फुंडकर यांनी गुजराती समाजाने व्यापारी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गुजराती समाज मंचच्या माध्यमातून अकोला भाजपने एक नवी संकल्पना समोर आणल्याचे सांगत, या मंचच्या माध्यमातून गुजराती समाजबांधवांच्या सर्व समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले.
तत्पूर्वी, किशोर मांगटे पाटील, आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनीही आपल्या मनोगतातून गुजराती समाजाने भाजप व शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा ऊहापोह घेतला. प्रास्ताविक, निमेश ठक्कर, संचालन सुनील कोरडिया यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर तसेच गुजराती समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अशी आहे कार्यकारिणी
कार्यकारिणीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून विजय परमार, शितल रुपारेल, तर सदस्य म्हणून निमेश ठक्कर, डॉ. दीपक वखारिया, अमरिष पारेख, दीपेन शाह, संजय कोरडिया, हरेश शाह, निकुंज गढिया, संदीप दोशी, मयूर गणात्रा, अँड. परेश सोलंकी, किरीट शाह, डॉ. सरजू उनडकाट, प्रकाश लोढिया, डॉ. पराग शाह, तुषार भीमजीयानी, आशिष चंदाराणा, पीयूष कोरडिया, संजय गोडा, मुकेश भाटिया, मित्तल पटेल, हितेश मेहता, विमल सावला, लाला जोगी, समीर शाह यांचा समावेश आहे.

Web Title: Akola will not let the funds fall short!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.