शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 अकोल्याचे पशुधन विकास मंडळ हलविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:50 PM

अकोला: पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुण्याला हलविण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. त्यासाठीच या कार्यालयाला कायमस्वरू पी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचे टाळण्यात येत आहे.

ठळक मुद्देहे मंडळ नागपूरला हलविण्यासाठीच्या मागणीचे पत्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.सध्या हे मुख्यालय अकोला येथे असले, तरी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सध्या पशुसंवर्धन आयुक्तांनीच या मंडळाचा अतिरिक्त कार्यभार ठेवला आहे.

अकोला: पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुण्याला हलविण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. त्यासाठीच या कार्यालयाला कायमस्वरू पी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचे टाळण्यात येत आहे. आताही तीच स्थिती असून, हे मंडळ नागपूरला हलविण्यासाठीच्या मागणीचे पत्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे; पण पशुसंवर्धन आयुक्त मात्र हे मंडळ पुण्याला नेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असल्याने हे मंडळ जाते कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विदर्भातील पशुधनाचा विकास तसेच राज्यातीलही पशुधनाचा विकास होण्यासाठी या मंडळाची अकोलासारख्या मागासलेल्या दुष्काळी जिल्ह्यात २००३ मध्ये राज्याचे पशुसंवर्धन मंत्री डॉ. डी. एम. भांडे असताना मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. या माध्यमातून पशुधनासाठीच्या अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतात. शेतकरी आत्महत्येच्या सत्रानंतर केंद्र व राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी भरघोस निधीची उपलब्धता या मंडळाला करण्यात आली होती. त्यातून अनेक पशुधनासाठीच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. त्याचा पशुपालक शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभही झाला. गायी, म्हशीचे वाटपही करण्यात आले. पॅकेज असेपर्यंत या मंडळावर काही काळ मुख्य कार्यकारी पद कायम होते. पॅकेज संपताच हे पद रिक्त झाले, त्यानंतर बºयाचदा मंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी काम बघितले; परंतु महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येत असल्याने ‘लोकमत’ने त्यावेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिले. त्यानंतर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पद भरण्यात आले; परंतु ते अधिकारी कायम येथे राहत नसल्याने पुण्याहून हा कारभार चालत असल्याचा आरोप होत आहे. तसेच मुख्यालय हालचालीचे अनेक वेळा प्रयत्न झाले. २०१५ मध्ये हे कार्यालय पुण्याला जाणार होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सामाजिक, राजकीय संघटनांनी आंदोलन केले होते. सध्या हे मुख्यालय अकोला येथे असले, तरी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.येथे अधिकारीच नसून, मंडळ नागपूरला हलविण्यात यावे, यासाठी नागपूरच्या महाराष्टÑ राज्य पशुकल्याण मंडळाचे सदस्य डॉ.देवेंद्र मोहने अकोल्याचे पशुधन विकास मंडळ नागपूरला हलविण्यासंबंधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. हेच पत्र गडकरी यांनी ४ फेब्रुवारी रोजी शिफारशीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या पत्रामुळेच हे मंडळ हलविले जाणार असल्याची चर्चा पशुसंवर्धन, शास्त्रज्ञ संबंधित अधिकारी, कर्मचाºयांमध्ये सुरू आहे.पशूसंवर्धन सचिवांनी याबाबत माहिती मागविली असल्याच ेवृत्त आहे.

  म्हणूनच पदे रिक्तअकोला जिल्हा मागासलेला भाग असून, येथे शेती व पशुसंवर्धन, पालनाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने या मंडळाची येथे स्थापना करण्यात आली. केंद्र शासनाने त्यासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पहिला हप्ता ५० कोटी मिळाले होते; पण सातत्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पदे न भरणे, मुख्य अधिकारी न देणे, सध्या पशुसंवर्धन आयुक्तांनीच या मंडळाचा अतिरिक्त कार्यभार ठेवला आहे. अकोलासारख्या मागासलेल्या भागात महत्प्रयासाने पशुधन विकास मंडळ मिळाले. त्याचे सुरुवातीला चांगले फायदे शेतकºयांना मिळाले; पण सतत हे मंडळ येथून हलविण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता पुन्हा ते मंडळ हलविण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी विद्यमान केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी शिफारशीसह पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. आम्हाला नव्या योजना,प्रकल्प देऊ नका, किमान आहे, ते तर येथून हलवू नका ही मागणी आहे.- डॉ. डी. एम. भांडे, माजी पशुसंवर्धन मंत्री, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर