अकोल्यात होणार लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: January 7, 2015 01:34 IST2015-01-07T01:34:29+5:302015-01-07T01:34:29+5:30

बाल विकास मंचच्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रथमच भव्य प्रमाणात आयोजन.

Akola will be organized in the inter-state cricket competition | अकोल्यात होणार लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

अकोल्यात होणार लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

अकोला : क्रिकेटच्या मैदानातील फलंदाजांची फटकेबाजी आणि गोलदांजांची गुगली अनुभवणे कोणाला आवडणार नाही? हा अनुभव आपण टीव्हीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यात सुरू असलेल्या सामान्यांमधून घेत असतो. क्रिकेटच्या मैदानात उतरून प्रत्यक्ष बॅट हातात घेऊन फटकेबाजी करणे आणि बॉल टाकून समोरच्याची गुगली घेणे हा अनुभव कसा वाटेल हो! हा अनुभव घेण्याची इच्छा ह्यलोकमतह्ण पूर्ण करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी आतंरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामुळे अकोलेकरांना शालेय क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.
नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर्स अँन्ड डेकोरेशन प्रस्तुत लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा-२0१५ ला बुधवार, २१ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होणार आहे. अकोला शहरात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असल्याने अकोला क्रिकेट क्षेत्रात नवचैतन्य पसरले आहे.
शालेय विद्यार्थ्यांंमधील क्रीडानैपुण्य वृद्धिंगत व्हावे, या दृष्टीने अकोला क्रिकेट क्लब अकोला, पॅरामाउंट स्पोर्ट्स, सहयोग फायनान्शियल मॅनेजमेंट सर्व्हिस लि. यांच्या सहकार्याने स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा २१ ते ३0 जानेवारी या कालावधीत होत असून, १२ षटकांचे सामने हे बाद पद्धतीने होतील.
१६ वर्षांखालील गटात खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांचा प्रवेश विद्यालयामार्फत स्वीकारण्यात येईल. दहा दिवस चालणार्‍या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट होणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर अशा वैयक्तिक पुरस्कारांसह विजेत्या आणि उपविजेत्या संघाला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. स्पर्धेत र्मयादित शालेय संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी लोकमतने नवोदित क्रिकेटपटूंना आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या माध्यमातूनएक संधी उपलब्ध करून दिली असून या माध्यमातून क्रीडानैपुण्याला निश्‍चितच वाव मिळेल, असे सांगीतले.

Web Title: Akola will be organized in the inter-state cricket competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.