अकोला शहरात होतील अद्ययावत स्वच्छतागृह!

By Admin | Updated: July 18, 2014 00:45 IST2014-07-18T00:29:33+5:302014-07-18T00:45:57+5:30

अकोला मनपाकडून निविदा जारी; प्रभाव लोकमतचा

Akola will be the latest clean-up of the city! | अकोला शहरात होतील अद्ययावत स्वच्छतागृह!

अकोला शहरात होतील अद्ययावत स्वच्छतागृह!

अकोला : साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत असल्याचे वृत्त नुकतेच ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले. या वृत्ताची व अकोलेकरांच्या होणार्‍या गैरसोयीची दखल घेत, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने शहराच्या विविध भागात तब्बल ३५ अद्ययावत सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया जारी केली. ह्यपे अँन्ड युजह्ण तत्त्वावरील स्वच्छतागृहांसाठी २८ जुलैपर्यंत इच्छुकांनी मनपाकडे निविदा जमा करणे भाग आहे.
अकोला शहराच्या बाजारपेठेत विविध कामांसाठी बाहेरगाववरून येणार्‍या नागरिकांसह अकोलेकरांची मोठी गर्दी पहावयास मिळते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे आवश्यक होते. स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होते. मूलभूत सुविधेशी निगडित ही बाब सत्तापक्षासह प्रशासनाने मार्गी लावणे अपेक्षित होते. परंतु पदाधिकार्‍यांसह प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रेंगाळला. मनपाचे तत्कालीन आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कार्यकाळात फायबरच्या मुतार्‍या बसविण्यात आल्या होत्या. परंतु त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांनी चार हात लांब राहणे पसंत केले. स्थायी समितीचे माजी सभापती विजय अग्रवाल यांनी ह्यबांधा, वापरा व हस्तांतरित कराह्ण, या तत्त्वानुसार शहरात १८ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रस्ताव २0१२ मध्ये पारित केला. त्यावर नगर रचना विभागाने १८ जागांची पाहणी करीत केवळ ७ जागा निश्‍चित केल्या होत्या. त्यानंतर पुढे कोणतीही हालचाल न झाल्याने हा प्रस्ताव अडगळीत पडून होता. या मुद्यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकताच, आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी दखल घेतली. उशिरा का होईना, प्रशासनाने ह्यपे अँन्ड युजह्ण व ह्यबीओटीह्ण तत्त्वावर शहरात ३५ ठिकाणी सुलभ शौचालय/ स्नानगृह उभारण्याचा निर्णय घेतला. मनपातील सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया जारी केली आहे.
अकोलेकरांसह बाहेरगावावरून येणार्‍या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मुद्दा आयुक्तांनी गंभीरतेने घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही चांगली संधी असल्याचे मनपा शहर अभियंता अजय गुजर यांनी सांगीतले.

Web Title: Akola will be the latest clean-up of the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.