अकोला शहरात होणार ‘एलईडी’चा झगमगाट!

By Admin | Updated: April 2, 2016 01:35 IST2016-04-02T01:08:00+5:302016-04-02T01:35:21+5:30

नऊ प्रमुख रस्त्यांचा समावेश; लोकप्रतिनिधींचा पुढाकार.

Akola will be the flag of the LED! | अकोला शहरात होणार ‘एलईडी’चा झगमगाट!

अकोला शहरात होणार ‘एलईडी’चा झगमगाट!

अकोला: शहरातील मुख्य रस्त्यांवर एलईडीच्या प्रकाशमान पथदिव्यांमुळे झगमगाट होणार आहे. एलईडी पथदिव्यांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे निधीची मागणी लावून धरली असता, शासनाने मनपाला मूलभूत सुविधेंतर्गत १0 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात मनपाला पत्र प्राप्त झाले आहे.
महापालिका प्रशासनाने वीज बचत करण्याच्या उद्देशातून शहरातील मुख्य रस्त्यांवर सीएफएल लाइट लावले. २00६ पूर्वी शहरात पिवळ्य़ा सोडियम पथदिव्यांचा वापर होत असे. अत्यंत प्रकाशमान असलेल्या सोडियम लाइटमुळे विजेचा जास्त वापर होऊन त्याचे देयक प्रशासनाला द्यावे लागत होते. यावर उपाय म्हणून सीएफएल लाइटचा पर्याय समोर आला. मात्र, सीएफएलच्या पथदिव्यांमुळे लख्ख प्रक ाश मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एका पथदिव्यांत चार नळ्य़ा लावल्या जातात. यापैकी बहुतांश वेळा दोन किंवा तीन नळ्य़ा बंद राहत असल्याने अकोलेकरांना रस्त्यांवर अंधूक उजेडाचा सामना करावा लागतो. सायंकाळ झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचा झगमगाट होणे अपेक्षित असताना अंधूक उजेड पडतो. या सर्व बाबी लक्षात घेता, आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्य रस्त्यांवर एलईडी लावण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असता, शासनाने १0 कोटी रुपये निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात मुख्य रस्त्यांवर लख्खं पथदिव्यांचा झगमगाट पहावयास मिळणार, हे निश्‍चित झाले आहे.

Web Title: Akola will be the flag of the LED!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.