शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:43 IST

दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळेवर बंडाचा झेंडा फडकावला. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केला. या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे.अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी दिवसभर राजकीय नाट्य रंगले होते. भाजपचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाºया या मतदारसंघात भाजपकडून चेहरा बदलला जाईल, अशी इच्छुकांना अपेक्षा होती. त्यासाठी काहींनी खुलेआम उमेदवारीची इच्छा दर्शविली तर काही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत होते. पक्षाने तब्बल सहाव्यांदा आ. शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले. ही खदखद मनात बाळगून असलेल्या इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याचे समोर आले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील विद्यमान सदस्य तथा माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर करीत स्वपक्षीयांच्या डोकेदुखीत वाढ केली आहे.

शिवसेनेची तलवार म्यानहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, यासाठी जीवाचे रान करणाºया शहर कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजता उमेदवारी अर्ज सादर करण्याची चर्चा होती. यादरम्यान कोठे माशी शिंकली, देव जाणे, सेनेतील नाराज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर न करता तलवार म्यान केल्याचे समोर आले.

अ‍ॅड. आंबेडकरांचे धक्कातंत्र!वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण नेहमीच धक्कातंत्र देणारे ठरले आहे. ‘वंचित’ने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीत अकोला पश्चिम मतदारसंघासाठी इम्रान पुंजानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शुक्रवारी अचानक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांना गळाला लावत त्यांना ‘वंचित’ची उमेदवारी देण्यात आली. अर्थात, भरगड यांच्या माध्यमातून काँग्रेसला ‘लक्ष्य’ करण्याची संधी साधल्याचे चित्र आहे.

टॅग्स :akola-west-acअकोला पश्चिमBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019