संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर, संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून कर्जमाफी देण्यात येत आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात दोन लाख थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी ६२ हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. ग्रीन याद्यांमधील ६२ हजार शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी २८७ कोटींची रक्कमदेखील प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने याद्यांची पडताळणी करून, शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. गुरुवार, ३0 नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील ५५ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत जमा करण्यात आली असून, संबंधित शेतकर्यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. त्यामुळे जिल्हा मध्ययवर्ती सहकारी बँकेच्या दोन्ही जिल्ह्यातील आतापर्यंत ५५ हजार शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
अकोला-वाशिम जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या ५५ हजार शेतकर्यांचे कर्ज ‘नील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:49 IST
अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले.
अकोला-वाशिम जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या ५५ हजार शेतकर्यांचे कर्ज ‘नील’!
ठळक मुद्दे२३८ कोटींची रक्कम कर्जखात्यात जमातीन दिवसांत दोन जिल्ह्यातील कर्जमाफी!