अकोला-वाडेगाव रस्त्याचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:13+5:302021-03-27T04:19:13+5:30

अकोला-वाडेगाव मार्गाच्या दुरुस्तीचे काम जवळपास मागील तीन वर्षांपासून हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत मार्गाचे काम रखडल्याने, परिसरातील नागरीकांसह ...

Akola-Wadegaon road work stalled! | अकोला-वाडेगाव रस्त्याचे काम रखडले!

अकोला-वाडेगाव रस्त्याचे काम रखडले!

अकोला-वाडेगाव मार्गाच्या दुरुस्तीचे काम जवळपास मागील तीन वर्षांपासून हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत मार्गाचे काम रखडल्याने, परिसरातील नागरीकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. मार्गाच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी करण्यात आलेल्या मागणीसह पाठपुरावा करण्यात आला. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडले नाही. यामध्ये विशेषतः मार्गाच्या दुरुस्तीबाबत नकाशी येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले होते. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी मार्गाच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. वाडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुबोध डोंगरे, सुगत डोंगरे यांच्यासह नागरिकांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. परंतु मार्गाच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. काम रखडलेल्या मार्गावर वाहतुकीमुळे उडणाऱ्या दगडांमुळे पादचारी गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.

फोटो:

अकोला-वाडेगाव मार्गाच्या दुरुस्तीबाबत नागरिकांची सहनशीलता संपली असून, बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे.

-मोहम्मद अफतार उर्फ बब्बूभाई, माजी पंचायत समिती सदस्य

मार्गाच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. निवेदन, तक्रारी देऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी लक्ष देत नाही. अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

-प्रशांत मानकर, माजी उपसभापती

Web Title: Akola-Wadegaon road work stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.