अकोला भाजीबाजारातून आजारांची विक्री!
By Admin | Updated: October 27, 2014 01:26 IST2014-10-27T01:26:10+5:302014-10-27T01:26:10+5:30
पावसामुळे घाणीचे साम्राज्य, भाजी विक्रेते व ग्राहक त्रस्त.

अकोला भाजीबाजारातून आजारांची विक्री!
अकोला: सध्या सर्वत्रच विविध आजारांनी थैमान घातले असताना भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरे, जनावरे, घाण पाणी व चिखलाच्या बाजूलाच असलेल्या भाजीबाजारातून भाजीपाला नव्हे तर आजारांची विक्री होत आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण भाजीबाजार सजला होता. शहरासह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी दिवाळीनिमित्त बाजारात फुले व विविध फळांची दुकाने लावली होती. दिवाळीमध्ये फुलांची विक्री न झाल्यामुळे घरी घेऊन जाण्याऐवजी दुकानदारांनी बाजारातच फुले टाकून दिली. तसेच या ठिकाणी नारळपाणी व उसाची विक्री करण्यात येते. नारळातील पाणी पिल्यानंतर ग्राहक नारळ तेथेच टाकून देतो तर उसाची खरेदी करताना त्यावरील पाला पाचोळा त्याच ठिकाणी फेकून देण्यात येतो. या कचर्यावर पाऊस पडल्यामुळे भाजीबाजारा त सध्या प्रचंड घाण पसरली आहे. हा कचरा सडला असून, या ठिकाणी डुकरे, गाई, बकर्या चरत आहेत. याच ठिकाणी भाजीविक्रेत भाजीपाला विकत आहेत. दुकानाशेजारीच घाणीचे डबके साचले असल्यामुळे भाजीपाल्यावर विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र आजारांनी थैमान घातले असून, रुग्णालये फुल्ल आहेत. त्यातच घाणीच्या साम्राज्यात भाजीपाल्याच्या विक्रीमुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.