शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थानांतरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:53 IST

अकोला: मनकर्णा प्लॉट परिसरातील डॉ. के.ए. अहमद उर्दू शाळेच्या प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, शाळा तीनदा स्थानांतरित करून नियमाचे उल्लंघन केले आहे.

ठळक मुद्देडॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही सुरुवातीला गवळीपुऱ्यातील साबेरा मंजिल नामक निवासस्थानी सुरू करण्यात आली होती. काही महिन्यातच शासकीय तंत्रनिकेतन शाळेसमोरील मनकर्णा प्लॉट परिसरातील अरेबीविला या निवासस्थानी ही शाळा स्थानांतरित करण्यात आली. तिसºयांदा डॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील महापालिकेच्या भूखंडावर स्थानांतरित करण्यात आली.

अकोला: मनकर्णा प्लॉट परिसरातील डॉ. के.ए. अहमद उर्दू शाळेच्या प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, शाळा तीनदा स्थानांतरित करून नियमाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाची तक्रार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे झाल्यानंतर, त्यांनी पथकाद्वारे शाळेची तपासणी करून शाळेसंबधी महत्त्वाची कागदपत्रे आणि संबंधित शिक्षण संस्थेला खुलासा सादर करण्यास बजावले आहे.डॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही सुरुवातीला गवळीपुऱ्यातील साबेरा मंजिल नामक निवासस्थानी सुरू करण्यात आली होती; परंतु काही महिन्यातच शासकीय तंत्रनिकेतन शाळेसमोरील मनकर्णा प्लॉट परिसरातील अरेबीविला या निवासस्थानी ही शाळा स्थानांतरित करण्यात आली. शाळा स्थानांतरित करायची असेल तर शासन नियमानुसार शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते; परंतु संस्थाचालकाने शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना अंधारात ठेवून आणि कोणतीही परवानगी न घेता, ही शाळा दुसºयांदा गजाला कॉम्पलेक्स, मनकर्णा प्लॉट येथे स्थानांतरित केली. यावेळीही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. गजाला कॉम्प्लेक्सची इमारत अनधिकृत असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गजाला कॉम्प्लेक्सचा काही भाग पाडून टाकला. त्यामुळे तिसºयांदा डॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील महापालिकेच्या भूखंडावर स्थानांतरित करण्यात आली. तेव्हाही शिक्षण विभागाच्या परवानगीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासंबंधीची तक्रार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे करण्यात आल्यानंतर, त्यांनी मंगळवारी दोन अधिकाºयांना शाळेत पाठवून तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे मागविली आहेत आणि तातडीने खुलासा सादर करण्यास बजावले आहे. त्यामुळे आता या शाळेवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी नाकारला होता निधीशिक्षण विभागाकडून अल्पसंख्यक शाळांना भौतिक सुविधांसाठी २ लाखांचा निधी देण्यात येतो. डॉ. के. ए. अहमद उर्दू शाळेलाही २ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु ही शाळा निवासस्थानी सुरू असल्याची आणि विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देत नसल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी या शाळेचा २ लाख रुपयांचा धनादेश थांबविला होता, हे विशेष.

डॉ. के.ए.अहमद उर्दू शाळेने शिक्षण विभागाची परवानगी घेता, तीन वेळा शाळा स्थानांतरित केली. हा नियमाचा भंग आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची होरपळ झाली. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळेची तपासणी करून खुलासा मागविला आहे. नियमानुसार शाळेवर कारवाई होईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकSchoolशाळा