शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयात एका संगणकावर तीन विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:21 IST

अकोला: सध्या इयत्ता बारावीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी यादगिरे यांना सिंधी कॅम्पमधील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकलची परीक्षा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून नव्याने या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेण्यास बजावले आहे. 

ठळक मुद्देबोर्ड सचिवांची तपासणी त्या विद्यार्थ्यांचे पुन्हा घेणार प्रॅक्टिकल!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सध्या इयत्ता बारावीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी यादगिरे यांना सिंधी कॅम्पमधील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकलची परीक्षा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून नव्याने या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेण्यास बजावले आहे. बारावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने, सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका संगणकावर प्रॅक्टिकलची परीक्षा देणे अनिवार्य आहे. असे असतानाही काही महाविद्यालयांमध्ये एकाच संगणकावर तीन ते चार विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहेत. शनिवारी माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी शहरातील मेहरबानो कनिष्ठ महाविद्यालय, सुफ्फा कनिष्ठ महाविद्यालय, एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्याल आणि गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी दिल्या. यावेळी बोर्ड सचिव यादगिरे यांना सिंधी कॅम्प परिसरातील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर या ठिकाणी एकाच संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकलची परीक्षा देत असल्याचे दिसून आले. लगेच त्यांनी ही परीक्षा थांबविली आणि येथील विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची परीक्षा रद्द करून नव्याने एक संगणक एक विद्यार्थी यानुसार प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे बजावले.  यासोबतच इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा झाल्यास, त्या रद्द करण्यात येतील, असा इशाराही यादगिरे यांनी दिला आहे.  

शनिवारी शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयात एकाच संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकल करताना दिसूत आले. त्यामुळे येथील परीक्षा थांबविली. नव्याने परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - संजय यादगिरेसचिव, माध्यमिक शिक्षण बोर्ड, अमरावती

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळाAkola cityअकोला शहर