अकोला : हजारो युवकांनी गोंदविले हातांवर ‘मी मराठा’
By Admin | Updated: September 19, 2016 13:38 IST2016-09-19T12:09:24+5:302016-09-19T13:38:44+5:30
मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोल्यात पोहचलेल्या हजारो युवकांनी त्यांच्या हातावर ‘मी मराठा’चे टॅटू काढून घेतले.

अकोला : हजारो युवकांनी गोंदविले हातांवर ‘मी मराठा’
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ - मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोल्यात पोहचलेल्या हजारो युवकांनी त्यांच्या हातावर ‘मी मराठा’चे टॅटू काढून घेतले. तरुणाईमध्ये ‘मी मराठा’ हा टॅटू स्फूर्ती निर्माण करणार आहे. अकोला चित्रकला संघटनेच्यावतीने हा उपक्रम टॉवर चौकात हा राबविण्यात आला असून, यात संघटनेचे ५0 पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. संघटनेचे कार्यकर्ते मोर्चातील सहभागी युवकांच्या हातावर ‘मी मराठा’ टॅटू काढून देत आहेत. या स्टॉलवर तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचणाºया तरुणाईच्या हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्रासह ‘मी मराठा’, ‘आम्ही मराठे’ असे लिखित टॅटू अकोला चित्रकला संघटनेचे कार्यकर्ते काढून देत आहेत.