शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकोला : नऊ कोटींच्या निविदेकडे मनपातील कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:33 AM

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले नवीन शासकीय दर व निविदेतील क्लिष्ट शर्ती-अटींमुळे नऊ क ोटींच्या विकास कामांकडे महापालिकेतील कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या कामासाठी निविदा अर्ज सादर करण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. प्रशासनाने निविदेतील जाचक अटी रद्द करेपर्यंत निविदा अर्ज सादर न करण्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतली आहे. 

ठळक मुद्देनिविदेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले नवीन शासकीय दर व निविदेतील क्लिष्ट शर्ती-अटींमुळे नऊ क ोटींच्या विकास कामांकडे महापालिकेतील कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या कामासाठी निविदा अर्ज सादर करण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. प्रशासनाने निविदेतील जाचक अटी रद्द करेपर्यंत निविदा अर्ज सादर न करण्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजनेंतर्गत महापालिक ा क्षेत्रात नऊ कोटी रुपयांतून विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या, धापे, सामाजिक सभागृह तसेच इतर कामे प्रस्तावित आहेत. नऊ कोटींच्या कामासाठी मनपा प्रशासनाने ई-निविदा प्रकाशित केल्या असता निविदेतील अटी व शर्ती पाहून कंत्राटदारांनी विकास कामांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या शासकीय दरात (सीएसआर) वाढ होण्याचा कंत्राटदारांना अंदाज होता. तसे न होता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी ‘सीएसआर’नुसार प्रति ब्रासचे दर ५ हजार ५२0 रुपये होते. नवीन ‘सीएसआर’नुसार ते ३ हजार ७५0 झाल्याची माहिती आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे कंत्राटदारांना १८ टक्के कर जमा करावा लागणार आहे. अशास्थितीत ‘सीएसआर’चे दर कमी झाल्यामुळे काम करणे शक्यच नसल्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मनपा प्रशासनाने जारी केलेल्या निविदेत सिमेंट रस्त्यांसाठी रेडी मिक्स प्लान्टची अट नमूद करण्यात आली आहे. ही अट कंत्राटदारांना अडचणीची आहे. ५0 लाखांच्या आतील सर्व रस्त्यांच्या व विकास कामांच्या निविदेतून रेडी मिक्स प्लान्टची अट रद्द करण्याची कंत्राटदारांची मागणी आहे. निविदेतील जाचक अटींसह कंत्राटदारांनी केलेल्या मागण्यांची प्रशासनाने पूर्तता करावी, तोपर्यंत नऊ कोटींच्या विकास कामांच्या निविदा सादर न करण्याचा निर्णय कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष हरीश मिरजामले, सचिव सुधीर काहाकर, मो.तय्यब, दीपक पांडे, संदीप गोखले, नीलेश वर्‍हाडे, गोपाल गाढे, रिषी खांडपूरकर, वहिद खान, इम्तियाज कासमानी, प्रणय बासोळे, सतीश मदनकार, शोहब राजा, अमोल पेंटेवार, किरण परभणीकर, सचिन वाघमारे, मुक्तीनारायण पांडे, अ. वहिद यांनी घेतला आहे. 

प्रशासनासमोर पेचमनपा प्रशासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर योजनेंतर्गत एकूण नऊ कोटींतून होणार्‍या विकास कामांच्या निविदा प्रकाशित केल्या. बुधवारी निविदा अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. कंत्राटदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यातून प्रशासन कसा तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

निविदेतील अटीसंदर्भात कंत्राटदारांच्या काही अडचणी असतील तर त्यावर तोडगा काढला जाईल. त्यासाठी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांसोबत चर्चा क रू. -जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका