शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 10:30 IST

Anti Corruption Bureau : विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांना अकोला एसीबीने शुक्रवारी सहआरोपी केले.

ठळक मुद्देपुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर लाचखोरी प्रकरणात सहआरोपी.शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले.

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास पाच हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून तपास केल्यानंतर याप्रकरणात अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांना अकोला एसीबीने शुक्रवारी सहआरोपी केले. लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती.

अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला नीलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी त्याच्या दुकानातून कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी १० टक्के याप्रमाणे म्हणजे पाच हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अटक केली होती. त्यानंतर कळसकर पोलीस कोठडीत असताना कसून चौकशी केली असता या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू होती.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी