विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला संघास सामूहिक विजेतेपद

By Admin | Updated: October 13, 2015 22:33 IST2015-10-13T22:33:41+5:302015-10-13T22:33:41+5:30

अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा; विजेत्यांची भंडारा येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड.

Akola team collective title in divisional school boxing championship | विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला संघास सामूहिक विजेतेपद

विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला संघास सामूहिक विजेतेपद

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे झालेल्या १७ वर्षांखालील अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे सामूहिक विजेतेपद अकोला संघाने पटकाविले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ही स्पर्धा शनिवार, १0 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. स्पर्धेत अभिजित तिवारी (अकोला मनपा), राम आरेवार (यवतमाळ), श्यामल टोपले (अकोला मनपा), आकाश सिंह, विशाल सुपे (अकोला मनपा), सिद्धार्थ पाटील (अकोला मनपा), आदित्य वानखडे (अकोला मनपा), अभिजित लांडे (अकोला मनपा), राहिल सिद्दिकी (अकोला ग्रामीण), क्षितिज तिवारी (अकोला मनपा), सौरभ पाठक (अकोला मनपा), पवन रायबोले (अकोला मनपा) यांनी विजय मिळविला. विजेत्यांची निवड भंडारा येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली. स्पर्धा समाप्तीनंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉ. राजेश, डॉ. घोरपडे, म्हैसने, सय्यद राही, जावेद अली, डॉ. कृष्ण मुराई, सतीश भट्ट, विजय गोटे, प्रा. जमील अहमद, विजय गोटे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Akola team collective title in divisional school boxing championship