राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला संघ घोषित

By Admin | Updated: December 2, 2014 23:36 IST2014-12-02T23:36:02+5:302014-12-02T23:36:02+5:30

मुंबई येथे ३६ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा.

Akola team announced for state-level karate competition | राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला संघ घोषित

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला संघ घोषित

अकोला : मुंबई येथे १३ व १४ डिसेंबर या कालावधीत आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला (मुली व मुले) जिल्हा संघ २ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला. प्रभात किड्स येथे २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून संघाची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील ५0 खेळाडूंनी चाचणी दिली होती. यामधून मुलींच्या संघात मृणाल वाकोडे, पूर्वा साबळे, मनीषा जव्हेरी, आर्या पटेल, समीक्षा अंभोरे, इशा शर्मा, सुकन्या यादव, तेजल ठाकूर, अमृता ढाले, वैष्णवी देशमुख, वज्रेश्‍वरी नाईक, नम्रता कांतगळे यांची निवड करण्यात आली. मुलांच्या संघात अथर्व राजकिन्नरकर, साहिल देशमुख, सुजल शहा, विशाल देशमुख, प्रथमेश हळदे, सोहम रोकडे, अभिजित डवले, अचित्य पाटील, श्रीयश ठाकरे, माणिक वानखडे, गौरव पिंपरकर, संतोष सहारे यांचा समावेश असल्याची माहिती अकोला कराटे असोसिएशनचे सुरेश ठाकरे यांनी दिली.

Web Title: Akola team announced for state-level karate competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.