अकोल्यात सूर्य कोपला!
By Admin | Updated: March 29, 2017 20:35 IST2017-03-29T20:35:23+5:302017-03-29T20:35:23+5:30
सूर्य अक्षरश: कोपल्याने बुधवारी अकोला शहराचे तापमान ४४ अंशांवर पोहचले.

अकोल्यात सूर्य कोपला!
तापमान ४४ अंशांवर : ह्यमार्च हिटह्णमुळे अकोलेकरांची होरपळ
अकोला : यावर्षी मार्च महिन्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, गत आठवडाभरापासून तापमापीतील पारा सातत्याने वर चढत आहे. सूर्य अक्षरश: कोपल्याने बुधवारी अकोला शहराचे तापमान ४४ अंशांवर पोहचले. पार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ आपल्या कडाक्याच्या उन्हासाठी प्रसिद्ध आहे. तापमानात विदर्भात चंद्रपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. यावर्षीचा उन्हाळा गत काही वर्षांतील तापमानाचे उच्चांक मोडेल, असा कयास हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्याचा प्रत्यय गत आठवडाभरापासून मार्च महिन्यातच येत आहे. गत चार दिवसांपासून शहरासह जिल्हय़ाचे तापमान सातत्याने वाढत असून, सूर्य प्रखरतेने तळपत असल्यामुळे पार्याने चाळीशी ओलांडली आहे. बुधवारी अकोला शहरातील तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची काहीली होत आहे. सकाळी नऊ वाजतापासूनच उन्हाचा कडाका असह्य़ होत आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता तापमापीतील पारा ३१ अंशांवर होता. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात पारा ४0 - ४२ अशांच्या पुढे सरकतो असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४४ अंशांवर पोहचले आहे. उष्णतेची ही लाट अशीच कायम राहिली, तर येत्या आठवडाभरात पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)