अकोल्यात विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
By Admin | Updated: September 13, 2016 18:20 IST2016-09-13T18:20:55+5:302016-09-13T18:20:55+5:30
चिंचखेड परिसरातील शेतावर मुजरी करणाºया शुभांगी सुनील झळके हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.

अकोल्यात विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पातूर, दि. १३ - येथून जवळच असलेल्या चिंचखेड परिसरातील शेतावर मुजरी करणाºया शुभांगी सुनील झळके हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चिंचखेड येथील रहिवासी सुनील झळके हा आपली पत्नी शुभांगी व गोविंदा, पूजासह याच गावातील दीपक धाडसे यांच्या शेतावर गेल्या दोन महिन्यापासून मजुरीने रात्रंदिवस मुक्कामी काम करीत होता. दोन दिवसाअगोदर माहेरी जाते म्हणून शुभांगी सुनील झळके व तिचे दोन मुलं गोविंदा सुनील झळके (वय ४ वर्षे) व लहान मुलगी पूजा सुनील झळके (वय २ वर्ष) शेतावरून निघून गेली. परंतु ही माहेरी न जाता हिने आपल्या दोन मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी शेतातील विहिरीवर दुसरे मजुर काम करण्याकरिता गेले असता त्यांना दोन मुले विहिरीतील पाण्यावर तरंगतांना दिसले. शुभांगी झळके याही सापडल्या नसल्याने त्यांनीही विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली असावी,असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.तसेच ४० फूट विहिरीला पाणी असल्यामुळे विहिरीत गळ टाकून शुभांगीचे शव काढण्यात आले. घटनेची माहिती वाºयासारखी पातूर परिसरात पोहचल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. घटनेची माहिती चिंचखेड गावात पोहचल्याने गावात दु:खाचा डोंगर कोसळला.
दोन मुलांसह आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांनी भेट दिली. तिघांचे मृतदेह वैद्यकीय शवविच्छेदनाकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी बीट जमादार प्रशांत उज्जैनकर, पवार, उपनिरीक्षकांसह पंचनाम करण्यात आला. याबाबत पातूर पोलिसांनी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अनिरुद्ध अढाव करीत आहेत.