अकोला : गुडधी येथील १२ वर्षांच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:48 IST2018-03-07T01:48:38+5:302018-03-07T01:48:38+5:30

अकोला : गुडधी येथील १२ वर्षांच्या मुलाची आत्महत्या
ठळक मुद्दे गळफास घेऊन आत्महत्या
अकोला : गुडधी येथील हर्षल राजेश गोपनारायण या बारा वर्षांच्या मुलाने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली.
हर्षल नेहमीप्रमाणे तो खेळून आल्यानंतर संध्याकाळी घरात गेला. यावेळी घरात कुणीही नव्हते. आतून दरवाजा लावून घेतल्यानंतर त्याने छताला ओढणी बांधली आणि गळफास घेतला. आतून दार बंद असल्याने काही वेळानंतर त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. मात्र काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या आई व बहिणींनी हा प्रकार शेजारच्यांना सांगितला. शेजारच्यांनी दरवाजा तोडला. मात्र, यावेळी हर्षल हा गळफास घेऊन मृत झाल्याच्या अवस्थेत त्यांना दिसला.