अकोल्याचे नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
By Admin | Updated: September 28, 2014 01:04 IST2014-09-28T00:49:04+5:302014-09-28T01:04:05+5:30
५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी अकोल्याचे नेमबाज निशांत व विधी पात्र ठरले आहे.

अकोल्याचे नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
अकोला : नवी दिल्ली येथे पुढील महिन्यात आयोजित ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी अकोल्याचे नेमबाज निशांत घोगरे व विधी वीरमाणी पात्र ठरले आहे. दोघेही राष्ट्रीय स्पर्धेत एअर पिस्टल १0 मी. या गटात खेळप्रदर्शन करणार आहेत.
१0 ते १९ सप्टेंबर या कालावधीत नॅशनल रायफल असोसिएशनच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या १८ व्या के.एस.एस. व पहिल्या स्पोर्टस् क्राफ्ट या राष्ट्रीय पूर्व नेमबाजी स्पर्धेत अकोल्यातील बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी निशांत संजय घोगरे याने ४00 पैकी ३५४ गुण प्राप्त करीत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
तसेच आदर्श ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी विधी विवेक वीरमाणी हिने १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई येथे झालेल्या दुसर्या वेस्ट झोन स्पर्धेत ४00 पैकी ३४५ गुण मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. या कामगिरीबद्दल दोघांचीही निवड ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. निशांत व विधी यांना प्रशिक्षक अमोल चव्हाण, अजिंक्य साहसी संघाचे धनंजय भगत यांचे मार्गदर्शन लाभले.