शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अकोला : उड्डाणपुलाच्या दोन्ही कडेला सात मीटर सर्व्हिस रोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 2:49 PM

मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपूलाचा सर्व्हिस रोड सात मीटरचा असणार आहे.

अकोला : शहरातील उड्डाणपुलाच्या दोन्हीकडील मार्ग कसा असेल, याबाबत अजूनही अकोलेकरांमध्ये संभ्रम आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपूलाचा सर्व्हिस रोड सात मीटरचा असणार आहे.जून १९ पासून सुरू झालेल्या उड्डाणपुलाला एकूण ४२ खांब आहेत. यापैकी ३८ खांब पूर्ण झालेआहेत. आता केवळ ४ खाबांची उभारणी शिल्लक राहिलेली आहे. ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनसाठी आणि काही ठिकाणी रॅम्पमुळे ओव्हरलोड येत असल्याने ६ खाबांच्या व्यासाचा आकार वाढविला गेला आहे. अतिरिक्त ओझे पेलण्याऱ्या या ६ खाबांचा आकार २.४ मीटरचा राहणार आहे. त्या ठिकाणचा सर्व्हिस रोड ७ मीटरचा असेल; पण निमुळता राहील. खाबांच्या व्यासामुळे हा बदल राहणार आहे. या सहा खाबांशिवाय उर्वरित ३६ खाबांचा आकार १.८ मीटर राहणार आहे. उड्डाणपूल खाबांच्या व्यासापासून दोन्ही कडेला ७ मीटरचा सर्व्हिस रोड सोडला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या शासकीय बंगल्याजवळदेखील खाबांच्या व्यासापासून ७ मीटर सर्व्हिस राहणार आहे. दोन्हीकडून सात मीटरची जागा व्यापत सर्व्हिस रोड निघणार आहे, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान क्रमांकाचे चार खाबं उभारण्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हे चारही खाबं बसस्थानकाजवळच्या अंडरपासजवळचे आहे. येथे अद्ययावत पद्धतीने पाइलची निर्मिती केली जाणार आहे. या खाबांची उभारणी होताच रॅम्पच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. कंत्राटदारास उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आॅगस्ट २०२१ मुदत देण्यात आली असली तरी त्याआधीच या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला