अकोला ‘एसडीओ’ कार्यालयात आवक-जावक ‘ऑनलाईन’!
By Admin | Updated: January 3, 2015 00:53 IST2015-01-03T00:53:02+5:302015-01-03T00:53:02+5:30
पत्रव्यवहाराची ऑनलाईन नोंद: विभागातील पहिला प्रयोग.

अकोला ‘एसडीओ’ कार्यालयात आवक-जावक ‘ऑनलाईन’!
संतोष येलकर/अकोला
अकोल्याच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात आवक-जावक प्रणाली विकसीत करण्यात आली असून, या प्रणालीव्दारे कार्यालयात प्राप्त होणार्या तक्रारी आणि निवेदनांची नोंद ह्यऑनलाईन ह्ण केली जात आहे. ह्यएसडीओह्ण कार्यालयातील पत्रव्यवहार ऑनलाईन करण्याचा हा प्रयोग अमरावती विभागात पहिल्यांदाच सुरु करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूलविषयक कामांबाबत नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी तसेच निवेदने प्राप्त होतात. या तक्रारी, अर्ज व निवेदनाच्या पत्रव्यवहाराची नोंद कार्यालयातील रजिस्टरमध्ये लिहून केली जाते; परंतू कार्यालयात प्राप्त होणार्या पत्रव्यवहारावर तातडीने आवश्यक ती कारवाई करुन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अकोला उपविभागीय कार्यालयात ह्यआवक-जावक ह्यप्रणाली विकसीत करण्यात आली. त्यानुसार आता ह्यएसडीओ ह्ण कार्यालयात प्राप्त होणारे अर्ज, तक्रारी व निवेदनांची नोंद आता संगणकावर ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. या प्रणालीव्दारे पत्रव्यवहार ऑनलाईन पध्दतीने कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचार्यांकडे आवश्यक त्या कारवाईसाठी पाठविला जात आहे. तसेच प्राप्त पत्रव्यवहारावर केलेल्या कारवाईची माहितीदेखील ऑनलाईन पध्दतीनेच वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी व संबंधितांना दिली जाते.
एसडीओ कार्यालयात होणारा पत्रव्यवहार आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईची नोंद आवक-जावक प्रणालीव्दारे ऑनलाईन करण्याचा प्रयोग नवीन वर्षापासून सुरु करण्यात आला. प्राप्त पत्रव्यवहारावर करावयाच्या कारवाईचा आढावा दर आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्पष्ट केले.
*दर आठवड्यात कारवाईचा आढावा!
आवक-जावक प्रणालीव्दारे एसडीओ कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारी,अर्ज, निवेदने आणि प्राप्त पत्रव्यवहारावर करण्यात आलेल्या कारवाईचा दर आठवड्यात उपविभागीय अधिकार्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राप्त प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणे आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेण्यात येणार आहे.
*नवीन वर्षापासून नवा प्रयोग!
नववर्षाचे औचित्य साधून, अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात १ जानेवारीपासून कार्यालयातील पत्रव्यवहार ह्यआवक-जावक प्रणालीव्दारे ह्ण ऑनलाईन करण्याचा नवा प्रयोग सुरु करण्यात आला.