अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:58 AM2020-03-13T11:58:06+5:302020-03-13T12:02:08+5:30

शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते.

Akola : Restaurants becomes Lover's Point | अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

Next
ठळक मुद्देरणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड भागात ही दृश्ये दिसतात. मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही.स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही.

- सचिन राऊत  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनियासे नही डरेंगे हम दोनो...हे गाणे एकेकाळी फार गाजले होते. असेच काहीसे चित्र शहराच्या गल्लीबोळात, रेस्टॉरंट्स आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये सर्रास पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांच्या या गुणांविषयी पालकांना काहीच माहीत नसले तरी त्यांच्यावर असलेला आंधळा विश्वास आई-वडिलांचाच विश्वासघात करणारा असल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते. मुली पळून गेल्यानंतर ५७ पैकी ४६ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले; मात्र याच मुलींनी नंतर ज्यांच्यासोबत गेल्या त्यांच्यासोबतच लग्न केल्याचेही समोर आले आहे.
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या आधुनिक राहणीमानाचे लोण अकोल्यातही धडकले आहे. मुले दहावीत जात नाहीत, तोच त्यांना महागड्या गाड्या, मोबाइल पालकांकडून पुरविले जातात. याचा उपयोग मुले कसा करीत आहेत, यावर मात्र पालकांचे अजिबात नियंत्रण नसल्याचे वास्तव सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमध्ये ही मुले काय दिवे लावतात, याची माहिती जेव्हा पालकांना होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड अशा अनेक भागात सहज फेरफटका मारला तरी ही दृश्ये दिसतात. ही मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही; परंतु वस्तुस्थिती निराळीच असते. लहान वयात चुकीच्या दिशेने पडणारी आपल्या मुलांची पावले पालक ओळखू शकत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुलांवर आंधळा विश्वास आणि अति प्रेमापोटी त्यांना जास्तीचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे आई-वडिलांनाच गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे वास्तव आहे.


स्कार्फ नव्हे सुरक्षा कवच
चेहरा स्कार्फने झाकून घेण्याची मुलींची सवय एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरू लागली आहे. स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही, याची त्यांना खात्री असते. हा स्कार्फच आता मुलींचे संरक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे.


५७ पैकी ४६ महिला मुलींना आणण्यात यश
जिल्ह्यातील एकूण ५७ महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६ महिला होत्या. यामधील ३९ महिलांना आणण्यात पोलिसांना यश आले तर ७ महिला परतच आल्या नाहीत, तर ११ अल्पवयीन मुली असून, यामधील ७ मुलींना परत आणण्यात पोलिसांची मोठी कामगिरी असल्याची माहिती आहे. यामधील ४ मुलींनी परत येण्यास नकार दिला. यानुसार जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या तसेच पळून गेलेल्या ५७ पैकी ४६ महिला व मुलींना आणण्यात पोलिसांना यश आले असून, ११ महिला व मुलींनी येण्यास नकार दिला.


तसेच त्यांचा पत्ता लागला नसल्याची माहिती आहे.

Web Title: Akola : Restaurants becomes Lover's Point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.