शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-पुणे शिवशाहीला औरंगाबादमध्येच लागला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:58 IST

अकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासून औरंगाबादमध्येच थांबणार आहे.

ठळक मुद्दे प्रतिसाद नसल्याने पुण्याच्या दोन्ही शिवशाही धावणार औरंगाबादपर्यंतच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासून औरंगाबादमध्येच थांबणार आहे. त्यामुळे अकोला-पुणे  शिवशाही रद्द झाली असून, शुक्रवारपासून ही बस अकोला-औरंगाबाद आणि औरंगाबाद-अकोला या मार्गावर धावणार आहे.नियमित भाडे येत नसल्याने लांब पल्ल्यावरील प्रवासी रातराणी गाड्या एसटी महामंडळाने बंद केल्यात. दरम्यान, वातानुकूलित असलेल्या  शिवशाही बसगाड्या राज्यात सर्वत्र सुरू केल्यात. अकोला आगार क्रमांक  १ साठी तीन आणि आगार क्रमांक २ साठी तीन, अशा एकूण सहा गाड्या दिल्या गेल्या होत्या. यापैकी चार बसगाड्या अकोला-नागपूर, तर दोन गाड्या अकोला-पुणे सुरू करण्यात आल्यात. २ ऑक्टोबर १७ गांधी जयंतीपासून सुरू झालेल्या या बसगाड्यांपैकी नागपूर फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अकोला-पुणे मार्गावर धावणार्‍या शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद लाभला नाही. ३0 टक्के प्रवासी वाहतुकीमुळे पुणे मार्गावर धावणार्‍या दोन्ही बसगाड्या तोट्यात चालत आहेत. ऑक्टोबरपासून सातत्याने तोट्यात चालत असलेल्या अकोला-पुणे, पुणे -अकोला शिवशाहीला एसटी मंडळाने ब्रेक लावून, तोट्यातून काढण्याचा प्रयत्न केला आहे. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी अकोल्यातून निघालेली शिवशाही औरंगाबादमध्येच  थांबविण्यात येणार आहे. अकोल्यातून पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांना औरंगाबाद येथून पुण्यासाठी वेगळी शिवशाही शोधावी लागणार आहे.

लग्न समारंभासाठी शिवशाहीला अधिक मागणी५४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराच्या  दरात  नवी-कोरी वातानुकूलित शिवशाही  लग्न समारंभासाठी भाडेतत्त्वावर मिळत असल्याने सवारीपेक्षा जास्त मागणी लग्न समारंभाच्या  कार्यक्रमासाठी होत आहे. अनेकांना ही गाडी मिळविण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहेत. लाब डब्ब्याची सवारी गाडी ४४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराच्या दराने दिली जाते. त्या तुलनेत ५४  रुपयांत नवी अन् वातानुकूलित शिवशाही गाडी मिळत असल्याने सर्वत्र मागणी वाढली आहे. किमान साडेतीनशे किलोमीटरसाठी शिवशाही देण्याची अट लागू आहे. नागरिक आणि एसटी महामंडळ दोघांसाठीदेखील शिवशाही परवडणारी सिद्ध होत आहे.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीAkola Bus Standअकोला बस स्थानकPuneपुणेAurangabadऔरंगाबाद