अकोल्याची पूजा आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष!
By Admin | Updated: November 4, 2015 02:58 IST2015-11-04T02:58:11+5:302015-11-04T02:58:11+5:30
निवडणुकीत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी.

अकोल्याची पूजा आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष!
अकोला : राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालयात बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन अँण्ड सर्जरी (बी.ए.एम.एस) च्या अंतिम वर्षाला शिकत असलेली पूजा दीपकराज डोंगरे ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाली. कुलगुरू डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गरकळ यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव विद्या ठाकरे यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या या निवडणुकीत पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान अकोल्याच्या रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाला मिळाला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पिंपरकर, डॉ. आशुतोष कुलकर्णी, अँड. दीपाली डोंगरे यांच्या सहकार्यामुळे तिला हे यश मिळाले आहे.