शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

अकोला : अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांचा निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:55 AM

अकोला : मुख्य मार्गावर फोफावलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. विभाग प्रमुख इंगोले यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावत असल्याचे सांगत, हा विभाग शहरातील अतिक्रमकांसोबत ‘सेटिंग’ करीत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी यावेळी केला. 

ठळक मुद्देमनपा स्थायी समितीचा निर्णयविभाग प्रमुख इंगोलेंमुळे मानसेवी कर्मचारी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्य मार्गावर फोफावलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. विभाग प्रमुख इंगोले यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावत असल्याचे सांगत, हा विभाग शहरातील अतिक्रमकांसोबत ‘सेटिंग’ करीत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी यावेळी केला. मनपा स्थायी समितीच्या सभागृहात मंगळवारी स्थगित सभेचे आयोजन करण्यात आले होते. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कलम ६७ (३)(४) चा वापर करून विविध फंडातून शहरात सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांतून विकास कामे केली. लहाने यांनी विकास कामांवर केलेल्या खर्चाची माहिती स्थायी समितीकडे सादर करणे बंधनकारक होते. याविषयासह विविध विषयांवर सभागृहात चर्चा पार पडली. सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी मागील सभेच्या इतवृत्तावर संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधितांची वेतनवाढ रोखण्याचा इशारा सभापती बाळ टाले यांनी दिला. मनपाच्या आवारभिंतीलगतचे अतिक्रमण काढण्याचा देखावा करणार्‍या अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांचा राजेश मिश्रा यांनी चांगलाच समाचार घेतला. विभाग प्रमुख या नात्याने इंगोले मनमानी कारभार करीत आहेत. त्यांच्या निष्क्रिय कामकाजामुळे अतिक्रमकांमध्ये मुजोरी वाढली असून, या विभागाची शहरातील अतिक्रमकांसोबत ‘सेटिंग’असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. यासंदर्भात प्रशासन दखल घेत नसल्यामुळे विभाग प्रमुखांना कोणाचाही धाक नसल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर, राष्ट्रवादीचे नगरसेवक फैयाज खान, मोहम्मद मुस्तफा यांनीही अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. सभापती बाळ टाले यांनी आत्माराम इंगोले यांची कानउघाडणी करीत अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो महासभेकडे पाठविण्यासह एक महिन्याचे मानधन कपात करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. 

दोन अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीसमनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कलम ६७ (३)(४) चा वापर करून विकास कामांसाठी मनपा निधी व १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्च केला. यातील बहुतांश कामे बांधकाम विभाग व जलप्रदाय विभागांतर्गत होती. जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे व बांधकाम विभागाचे शहर अभियंता इक्बाल खान सभेला अनुपस्थित असल्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सभापती बाळ टाले यांनी दिले. 

उपायुक्त म्हणाले, आयुक्तांचे आदेश होते!तत्कालीन आयुक्त लहाने यांच्या निर्देशानुसार कंत्राटदारांनी विकास कामे केली. सदर कामांची देयके अदा करताना आक्षेप का नोंदवला नाही, असा सवाल भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी मुख्य लेखा परीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांना केला. त्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार देयके अदा केल्याचे सांगत सोळसे यांनी जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून आले. 

तत्कालीन आयुक्तांसाठी कारवाई ठराव घ्या!तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी विकास कामांसाठी कलम ६७ (३)(४) चा वापर करण्याची खरोखर गरज होती का, देयकांचे तुकडे का पाडण्यात आले यावर भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी सभागृहाला विचारणा केली. त्यावर तत्कालीन आयुक्तांचा कारभार पाहता त्यांच्यावर कारवाईचा ठराव घेण्याची मागणी सुमनताई गावंडे यांनी केली. मर्जीतल्या कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी निधीचा मनमानीरीत्या वापर केल्याचे सभापती बाळ टाले यांनी नमुद केले. बांधकाम विभाग व जलप्रदाय विभागाचे विभाग प्रमुख सभेला उपस्थित नसल्यामुळे हा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय सभापती बाळ टाले यांनी घेतला. 

नगरसेवकांच्या तक्रारीला ठेंगाराष्ट्रवादीचे नगरसेवक फैयाज खान यांनी प्रभागातील अतिक्रमणासंदर्भात तीन महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभाग व झोन अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांच्या तक्रारीला ठेंगा दाखवत अतिक्रमण विभागाने कारवाई केलीच नाही. अखेर सभागृहात हा मुद्दा समोर येताच व सभापतींनी आत्माराम इंगोले यांची खरडपट्टी काढल्यानंतर तक्रारीचे निरसन करणार असल्याचे दक्षिण झोन अधिकारी राजेंद्र घनबहाद्दुर यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका