अकोला पूर्वमध्ये भाजपचा झाला निसटता विजय
By Admin | Updated: October 20, 2014 01:52 IST2014-10-20T01:52:39+5:302014-10-20T01:52:39+5:30
भारिप-बमसंला बंडखोरीची लागण.

अकोला पूर्वमध्ये भाजपचा झाला निसटता विजय
अकोला : विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघात भाजपला निसटता विजय मिळाला. भाजपचे उमेदवार रणजित सावरकर हे २ हजार ४४0 मतांनी विजयी झाले. सावरकर यांना ५३ हजार ६७८ तर भारिपचे हरिदास भदे यांना ५१ हजार २३८ मतं मिळाली. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजातील मतांचे विभाजन भारिप-बमसंच्या पथ्यावर पडत होते. यावेळच्या निवडणुकीतही भाजपचे रणधीर सावरकर, राकॉँचे शिरीष धोत्रे, कॉँग्रेसचे डॉ. सुभाष कोरपे आणि अपक्ष उमेदवार विजय मालोकार हे चार मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात होते; मात्र यावेळच्या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्याने मतांचे विभाजन झाले. तसेच यावेळच्या निवडणुकीत बंडखोरीची लागण भारिप-बमसंला झाली. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरीत शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी आघाडी घेतली; मात्र दुसर्या फेरीत भारिप-बमसंचे भदे यांनी आघाडी घेतली. या दोन्ही फेर्यात सावरकर पिछाडीवर होते. आठव्या फेरीत तर भदे यांना तब्बल २0 हजार १४0 तर सावरकर यांना १२ हजार ६८७ मतं मिळाली. १३ व्या फेरीपासून मात्र सावरकर यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांची ही आघाडी शेवटच्या २३ व्या फेरीपर्यंंंत कायम होती.
*टपाल मतांमध्ये भाजपची आघाडी
सर्वाधिक ३३७ टपाल मतं भाजपचे रणधीर सावरकर यांना मिळाली. हरिदास भदे-२४५, गोपीकिशन बाजोरिया-१४0, डॉ. सुभाष कोरपे-४५ आणि शिरीष धोत्रे यांना ७३ टपाल मतं मिळाली.