शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : वर्चस्वाच्या वादातून आठ जणांनी मिळून केली प्रशांत निंगोटची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:22 IST

अकोला: भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंगोट यांचे भीम नगर परिसरात वाढत  असलेले वर्चस्व सहन न झाल्यामुळे, त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस त पासात निष्पन्न झाले आहे. खदान पोलिसांनी आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,  आरोपींचा शोध सुरू आहे. 

ठळक मुद्देआरोपींचा शोध सुरू; दोन आरोपी गजाआड 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंगोट यांचे भीम नगर परिसरात वाढत  असलेले वर्चस्व सहन न झाल्यामुळे, त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस त पासात निष्पन्न झाले आहे. खदान पोलिसांनी आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,  आरोपींचा शोध सुरू आहे. माधव नगरातील गजानन विहार अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रशांत सुखलाल निंगोट हे माजी  आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या  संघटनेमार्फत सामाजिक व क्रीडा कार्यामध्ये अग्रेसर होते. गत काही वर्षांमध्ये त्यांच्या नेतृ त्वात युवकांचे मोठे संघटन उभे राहिले होते. गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांत  निंगोट घरी असताना, भीम नगरात राहणारे आकाश ऊर्फ पव्या सिरसाट, आशुल्या  सिरसाट, प्रेमा सिरसाट, अंकुश यांच्यासह चार अनोळखी युवक त्यांच्या घरासमोर आले.  त्यांनी प्रशांत निंगोट यांना फोन लावला आणि त्यांना बाहेर बोलावले. निंगोट बाहेर  आल्यावर चर्चा करण्यासाठी कुठेतरी बसू, असे सांगितले. त्यामुळे प्रशांत निंगोट यांनी  मोटारसायकल काढली आणि अमर इंगळे याला सोबत घेतले. राऊंड रोडवरील पिल  कॉलनीजवळ आल्यावर, आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा, अंकुश व इतर  युवकांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून  त्यांची हत्या केली, तसेच निंगोट यांच्यासोबत असलेल्या अमर इंगळे यालाही लाथाबुक् क्यांनी मारहाण करून जखमी केले.  त्यानंतर आरोपी फरार झाले. प्रशांत निंगोट हे भीम  कायदा संघटनेच्या माध्यमातून युवकांना जोडून, भीम नगरातील आंबेडकर मैदानात कबड्डी  व शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करायचे. त्यामुळे भीम नगर भागात निंगोट यांचे वर्चस्व  वाढत होते. हीच बाब भीम नगरातील आकाश, आशुल्या, प्रेमा आणि अंकुश सिरसाट  यांना सहन झाली नाही. यातून अनेकदा त्यांचे खटकेसुद्धा उडत. निंगोट यांचे वर्चस्व सहन न झाल्यामुळेच आरो पींनी कट रचून, त्यांची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  दामले  चौकात राहणारा अमोल भास्कर वाघमारे(३८) यांच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध भादंवि  कलम ३0२ (खून), १२0 (ब) ( कट कारस्थान रचणे), ३२३, ३२५( गंभीर दुखाप त) नुसार गुन्हा दाखल केला.  प्रशांत निंगोट यांच्यावर शुक्रवारी जुने शहरातील  स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

निंगोट हत्याकांडातील दोन आरोपी गजाआडप्रशांत निंगोट यांची राउंड रोडवरील पिल कॉलनीजवळ निर्घृण हत्या करणारे आकाश ऊर्फ  पवे सिरसाट आणि आशिष ऊर्फ आशुल्या सिरसाट यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी  शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली.  उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आकाश व आशिष याला अमरावती जिल्हय़ा तील पथ्रोटजवळील रहिमापूर गावातून अटक करण्यात आली. रात्री उशिरा आरोपींना  खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात  येईल. ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिनकर  बुंदे, नरेंद्र चाटी, आशिष ठाकूर, अश्‍विन सिरसाट, अमित दुबे, राजू वानखडे, शक्ती  कांबळे, शेख हसन, मनोज नागमते यांनी केली.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा