शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कार खरेदी फसवणुकीत अकोला पोलिसांकडूून पुण्यात चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:13 IST

पोलिसांच्या चौकशीत ही कार मिरगे यांनी पुण्यात विकल्याचे समोर येताच जुने शहर पोलिसांनी पुण्यात पथक पाठवून कार खरेदीदारांची चौकशी केली.

अकोला : पारसकर हुंडाई शोरूम येथून कार खरेदी केल्यानंतर ओळखीचा फायदा घेत पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) देण्याचे आमिष देऊन ते चेक न देता शोरूम मालकाची सुमारे ४ लाख ९३ हजार ८९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत ही कार मिरगे यांनी पुण्यात विकल्याचे समोर येताच जुने शहर पोलिसांनी पुण्यात पथक पाठवून कार खरेदीदारांची चौकशी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांनी ६ लाख ६८ हजार रुपयांची आसेंट कार ३० सप्टेंबर २०१९ रोजी पारसकर हुंडाई येथून खरेदी केली, तसेच २६ हजार रुपयांच्या अ‍ॅसेसरिज लावल्या. कारची रक्कम ९ धनादेशांद्वारे देण्याचे विवेक पारसकर यांना सांगितले. यावर पारसकर यांनी विश्वास ठेवला तसेच मुलगा पुण्याला राहत असल्याने कार पुण्याला नेणार असल्याचे सांगत कारची पासिंगही तातडीने करून घेतली; मात्र पारसकर यांनी पैसे मागितले असता, आशा मिरगे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश २ मार्च रोजी दिला. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विवेक पारसकर यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून जुने शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दरम्यान तपास अधिकारी कारच्या शोधासाठी तसेच चौकशीसाठी पुणे येथे गेले असता सदर कार मिरगे यांनी एका कंपनीला विकल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीने ही कार आणखी तिसऱ्या व्यक्तीस विकली; मात्र मिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल होताच कार खरेदी केलेल्या व्यक्तीने पैसे परत घेऊन ती कार कंपनीला परत केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून, पुण्यात चौकशीसाठी गेलेले पथक परतले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाPuneपुणे